तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व्हिजन ठरविणार – अमोल राळेभात

0
198
जामखेड प्रतिनिधी
जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी व्हिजन तयार करण्यात येत असून त्यामुळे शेतकरी समृद्ध बनतील व सेवा संस्था सशक्त होतील यासाठी आपले प्राधान्य असणार असल्याची माहिती नवनिर्वाचित संचालक अमोल राळेभात यांनी दिली.
       खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यालयात नवनिर्वाचित जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल राळेभात यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार कार्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, साकत सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट, अशोक निमोणकर, सचिव नितीन सपकाळ, दिपक नेटके, आबासाहेब कोंढाणे, गोरख वराट, गणेश पोकळे, प्रदिप लहाने, कृष्णा पुलवळे  आदी उपस्थित होते.
         यावेळी बोलताना संचालक अमोल राळेभात म्हणाले, माझे वडील जगन्नाथ राळेभात यांनी १५ वर्षे संचालक पद उपभोगताना शेतकऱ्यांची सेवा केली कर्जप्रकरणात कोणालाही अडवले नाही त्याच धर्तीवर आपण काम करू शेतकऱ्यांची अर्थीक उन्नती व्हावी यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असून पाच वर्षांचे व्हिजन तयार करीत आहोत व लवकरच त्याची अंमलबजावणी करू असे राळेभात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here