जामखेड प्रतिनिधी
अश्विनी राऊत हिची डाऊट शॉर्टफिल्म येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला ग्रामीण भागातील जामखेड तालुक्यातील गरीब कुटुंबातील होतकरू कलाकार अश्विनी राऊत हिची नुकतीच एक शॉर्ट फिल्म काही दिवसात रिलीज होणार आहे.

आंधश्रध्दा व शकुन अपशकुन कशा पद्धतीने मोडीत काढली आहे या विषयावर मत मांडणारी ही शॉर्ट फिल्म आहे. आश्विनी हीने अतिशय गरीब परीस्थिती शिक्षणावर मात करून प्रोफेसर म्हणून शिक्षिका म्हणून काम केले प्रोफेसर असुन देखील अभिनयाची आवड आसल्याने तीने फील्म इंडस्ट्रीज मध्ये पदार्पण केले. या पुर्वी देखील तीने अनेक शॉर्टफिल्म मध्ये काम केले आहे. हया फिल्म चे निर्माता अश्विनी राऊत व ज्योती खराडे कथा पथकथा इरफान कुरेशी, दिग्दर्शक सय्यद मोईनुद्दीन इनामदार हे आहेत. येत्या काही दिवसांत दिपज्योत इंटरटेनमेंट प्रस्तुत आसलेल्या या शॉर्ट फिल्म चे नाव डाऊट (संशय) असे असुन अतिशय भावनिक विषयात हात लेखकाने घातला आहे. या मराठी शॉर्टफिल्म ची कथा पटकथा व संवाद इरफान कुरेशी असुन याचे दिग्दर्शक इनामदार यांनी केले आहे व संकलन तुषार गुजराती, जयराम खेडकर यांनी केले तर या फील्म च्या निर्माती ज्योती खराडे व अश्विनी राऊत आहेत. अश्विनी राऊत हीने या पुर्वी देखील नात धर्मा पलीकडचं, M.H.23 ये वेबसीरीज मध्ये काम केले आहे. यानंतर त्यांची डाऊट शॉर्टफिल्म येणार असुन येत्या एक ते दोन महीन्यात रीलीज होणार आहे. सदर शॉर्ट फिल्म ही नगर, हैदराबाद, पुणे मुंबई या ठिकाणी इंटरनॅशनल साठी पाठवणार आहे. एप्रिल महिन्यात अश्विनी हीची मोठ्या पडद्यावरील आसलेल्या फील्म चे शुटींग सुरू होणार आहे. त्यामुळे तीला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळणार आहे.