जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
ह. भ. प. दिपक महाराज गायकवाड यांच्यामुळेच जामखेडकरांना महाराष्ट्रातील थोर नामांकित किर्तनकार व समाजसुधारकांच्या विचारांची मेजवानी मिळते असे मत नगरसेवक अमित चिंतामणी यांनी व्यक्त केले. दिपक महाराज गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदेच्या स्वच्छता करणार्या माता भगिनींसाठी साडी वाटप करण्यात आले.
दिपक महाराज गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भक्ती शक्ती महोत्सव समितीच्या वतीने शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या नगरपरिषदेच्या महिला कर्मचार्यांना साडी वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी अमित चिंतामणी बोलत होते. यावेळी सोमनाथ पोकळे, दत्तात्रय सोले, प्राचार्य डॉ. सुनील नरके, अॅड. प्रविण सानप, पंढरीनाथ राजगुरू यांच्या सह अनेक भक्ती शक्ती समितीचे सदस्य हजर होते.
यावेळी बोलताना अमित चिंतामणी म्हणाले की, दिपक महाराज यांच्यामुळेच शहराला अध्यात्मिक व सांप्रदायिक आवड निर्माण झाली. महाराजांचे संघटन कौशल्य चांगले आहे. त्यामुळेच आम्हाला सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळते.
अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी बोलताना ह. भ. प. दिपक महाराज गायकवाड म्हणाले की, शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी अनेक हात झटत असतात या सर्वाचा गुणगौरव व्हावा शहराच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या माता भगिनींसाठी भक्ती शक्ती महोत्सव समितीच्या वतीने साडी वाटप कार्यक्रम राबविण्यात आला आहे. कमिटीतील प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळा उपक्रम राबविण्यात येतो. अमित चिंतामणी यांच्या वाढदिवसानिमित्त नागेश्वर मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले होते.