जामखेड न्युज – – – –
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर साकत येथे श्री साकेश्वर यात्रा उत्साहानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरविण्यात आले होते यात प्रथम क्रमांकाची कुस्ती सागर मोहळकरने मनोज माने यास आस्मान दाखवत एक्कावन्न हजार सदुसष्ट रूपयांचे रोख बक्षीस तसेच मानाची गदा पटकावत दुसर्यांदा साकेश्वर केसरी किताबाचा मानकरी ठरला
जामखेड तालुक्यात साकत येथे श्री साकेश्वर महाराज हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दोन दिवस यात्रा चालते. पहिल्या दिवशी गोदावरी नदीवरून आणलेल्या जलाने देवाला अभिषेक घातला जातो. जे कावडीला जातात ते अणवाणी पायाने जातात व येतात. नंतर दुपारी शेरणी वाटप असते. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतात. दुसर्या दिवशी हगामा असतो. येथील हगामा म्हणजे परिसरातील मल्लांना मोठे आकर्षण असते. संपूर्ण राज्याभरातून मल्ल हजेरी लावतात व आपले कसब दाखवतात.
शेवटची कुस्ती साकेश्वर केशरी सागर मोहळकर विरूद्ध
मनोज माने यांच्यात झाली सागर मोहळकरने माने यास आस्मान दाखवत ५१०६७ रूपये रोख व मानाची गदा पटकावली दुसर्यांदा साकेश्वर केशरी किताबाचा मानकरी ठरला यासाठी कुस्ती सौजन्य कै. देवराव वराट गुरूजी यांच्या स्मरणार्थ प्रा. अरूण वराट चेअरमन यांच्या तर्फे होते.
द्वितीय क्रमांकाची कुस्ती बापू जरे विरूद्ध गणेश काळे अशी झाली यात बापू जरेने बाजी मारली व ३१०६७ रूपयांचे बक्षीस पटकावले यासाठी कुस्ती सौजन्य कै अशोक त्रिंबक वराट यांच्या स्मरणार्थ विनोद अशोक वराट समाजकल्याण अधिकारी पाटोदा यांच्या मार्फत होते.
तृतीय क्रमांकाची कुस्ती श्रीराम बेडके विरूद्ध रवी खैरे अशी झाली यात रवी खैरेने बाजी मारली व ३१०६७ रूपये बक्षीस पटकावले कुस्ती सौजन्य हनुमंत पाटील सरपंच साकत तसेच संजय वराट माजी सभापती पंचायत समिती यांच्या मार्फत होते.
चौथ्या क्रमांकाची कुस्ती संदिप लटके विरूद्ध प्रमोद सुळ ही कुस्ती बरोबरीत सुटली यासाठी कुस्ती सौजन्य डॉ. भगवानराव मुरुमकर सभापती पंचायत समिती हे होते.
हगाम्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियन्स सचिन दाताळ याचा सत्कार करण्यात आला.
हा हगामा दुपारी चार वाजल्यापासून ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत चालला होता तोपर्यंत तोबा गर्दी होती.
या हगाम्यासाठी बाळू आवारे, अजय काशिद, बालाजी जरे, सचिन दाताळ, मोहन अडसुळ शरद कार्ले, हवा सरनोबत, विठ्ठल देवकाते यांनी पंच म्हणून काम पाहिले तर निवेदक म्हणून राजाभाऊ देवकाते यांनी काम पाहिले साकेश्वर यात्रा कमिटीने हगामा व यात्रेचे उत्तम नियोजन केले होते. कुस्ती निवेदक म्हणून दिनेश गवळी बार्शी हे होते उत्तम निवेदन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
संजय वराट, डॉ. भगवानराव मुरुमकर, हनुमंत पाटील, प्रा. अरुण वराट, कैलास वराट, देविदास वराट व वसंत वराट तसेच पोलीस पाटील महादेव वराट, शहादेव वराट, नवनाथ बहिर, श्रीराम घोडेस्वार, राजाभाऊ वराट,
सह सर्व सर्वच ग्रामस्थांनी उत्तमपणे नियोजन केले होते.
चौकट
गावात मोठ्या उत्साहात भव्य दिव्य हगामा भरविण्यात येतो उत्तमपणे नियोजन केले जाते पण गावात एकही तालीम नाही हि खंत गावात आलेल्या मल्लांनी बोलून दाखविली कारभारी मंडळींनी एकत्र येऊन चांगली तालिम
करण्यासाठी प्रयत्न करावेत.