Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या मतदारसंघातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध विकासकामांसाठी रमजानच्या पवित्र महिन्यात आ. रोहित पवारांनी आणला...

मतदारसंघातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध विकासकामांसाठी रमजानच्या पवित्र महिन्यात आ. रोहित पवारांनी आणला भरघोस निधी!

0
245
जामखेड न्युज – – – – 
कर्जत जामखेड मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सोडवले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक समूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासनातर्फे ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अल्पसंख्याक समाजातील विविध विकास कामांसाठी आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून कर्जतमधील 18 गावांसाठी 1.5 कोटी रुपये तर जामखेड मधील 18 गावांसाठी 1.5 कोटी रुपये असे एकूण 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक समाजातील विविध विकास कामे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे चित्र पाहायला मिळाल्या नंतर आमदार रोहित पवार यांनी या सर्व बाबींकडे वैयक्तिक लक्ष घालून अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या सभामंडपाची उभारणी करणे, नवीन शादीखाना बांधकाम करणे, मस्जिद परिसरात रस्ता बांधणे, मुस्लिम कब्रस्तान विकासित करणे तसेच कबरस्तान आला संरक्षक भिंत उभारणे, पेविंग ब्लॉक बसवणे या बरोबरच शादीखाना दुरुस्ती इत्यादी कामांसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून निधी उपलब्ध करून आणला आहे. याचा अल्पसंख्यांक समाजाला फायदा होणार असून या माध्यमातून आमदार रोहित पवार यांचं मतदारसंघातील बारीक-बारीक गोष्टींकडे विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच ते शासन स्तरावर विविध विषयांवर पाठपुरावा करून वेळोवेळी मतदारसंघाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणत आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात अल्पसंख्यांक समाजाच्या विकासकामांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आणल्याने सध्या मतदारसंघात आमदार रोहित पवारांच्या कामाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!