जामखेड न्युज – – –
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रहार केला होता. याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
एकेकाळी तुम्ही पवारसाहेबांचीच मुलाखत घेता अन् त्यांचं कौतुक करतात. असा काय आता चमत्कार घडला की, मुलाखत घेताना यांना पवारसाहेब जातीयवादी वाटले नाही आणि एकदमच काही दिवसातच त्यांना जातीयवादी वाटू लागले.
पवारसाहेब आज काही देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात आहेत? पवारसाहेब हे 1962 पासून युवक काँग्रेसमध्ये काम करत आहेत, तेव्हा यांचे जन्म देखील झाले नव्हते. खरंतर अशा लोकांनी पवारसाहेबांबात टीका-टीपण्णी करणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखं आहे. ही वस्तूस्थिती आहे. राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती असंही अजित पवार म्हणाले.
राज ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करत आहेत असा आरोप केला होता. याला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. अजित पवार म्हणाले, पवार साहेबांचा विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पुढे जात आहे. परंतु आजही हौसे, गवसे, नवसे पवार यांच्यावर टीका-टिप्पणी करतात. यांना पवार साहेब यांचे नाव घेतले शिवाय, यांना महत्त्व मिळत नाही. तीन पिढ्या महाराष्ट्राचा राजकारण शरदराव पवार या एक एका व्यक्तीसमोर फिरतंय. काहीतरी कर्तुत्व असल्याशिवाय फिरतंय का? या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे.
पवारसाहेब रात्रंदिवस काम करत आहेत. लोकांना मार्गदर्शन करतायेत. चांगला विचार मांडत आहेत. म्हणे पवारसाहेब यांनी जातीपातीचे राजकारण केले आहे. वारे…. पट्ट्या कुठले जातीपातीचे राजकारण…. आणि कुणी सांगावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता खडे बोल सुनावले आहेत.
अजित पवार पुढे म्हणाले, पवारसाहेबांनी आज पर्यंतचे जे निर्णय घेतले आहेत. पहिल्यापासून प्रत्येक बाबतीत सर्व धर्म समभाव हीच भूमिका स्वीकारली आहे. सर्वांनी मिळून पुढे गेले पाहिजे. हाच साहेबांचा विचार आहे. परंतु आजही साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत टीका-टिप्पणी करायची हे आज आपण ओळखलं पाहिजे असे सांगितलेय.



