जामखेड न्युज – – – –
यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाळपाचा हंगाम संपत आला तरीही मराठवाड्यात आणखी जवळपास तीस टक्के ऊस शेतात अंतीम घटका मोजत आहे. तुरा फुटलेला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक ठिकाणी आग लागून ऊसाची राखरांगोळी होताना शेतकरी मुकाट्याने पाहत आहेत.
मागील वर्षापेक्षा यावर्षी ऊसाचे क्षेत्र वाढले आहे आणि यावर्षी गाळप हंगाम सुरू व्हायला वेळ लागलेला आहे. यामुळे यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षीचा गाळप हंगाम संपत आला तरीही मराठवाड्यात जवळजवळ तीस टक्के ऊस आणखी शेतात ऊभा आहे. यामुळे त्याचे वजन देखील घटले आहे. शेतकरी अडचणीत आले आहेत. मराठवाड्यात यावर्षी गोड ऊस कडू झाला आहे. ऊस तोडणीसाठी लेबर कडून दहा हजार मागीतले जातात तर प्रतेक गाडी करीता मग एक हजार आणि खायला मटणाची मागणी होत असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी सांगतात. एवढ्या मागण्या मान्य केल्या तरीही प्रत्यक्ष ऊसाला तोडणी नेमकी कोणत्या दिवशी येईल हे नक्की नसते यामुळे यावर्षी गोड ऊसाने शेतकऱ्यांना कडू केले आहे.









