Friday, March 13, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवार यांच्या प्रभाग १० मधिल रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न, माजी...

आमदार रोहित पवार यांच्या प्रभाग १० मधिल रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न, माजी सरपंच कैलास माने यांच्यातर्फे आमदार रोहित पवारांचे स्वागत

0
342

 

जामखेड प्रतिनिधी

                         जामखेड न्युज – – – – 

शहरातील तपनेश्वर भागातील प्रभाग क्रमांक १० मधिल रस्त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी रस्ता केल्या बद्दल जामखेड चे माजी सरपंच कैलास माने यांनी त्यांचे स्वागतकरुन आभार मानले.

जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील प्रभाग क्रमांक १० मधिल देशमुख यांचे घर ते माजी सरपंच कैलास माने यांच्या घरापर्यंत नगरविकास विभाग अंतर्गत सेमेंट कॉंक्रेट चा रस्ता तयार करण्यात आला. याचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रभाग क्रमांक १० मध्ये आ. रोहित पवार यांच्या सहकार्यातून रस्ता झाल्याने जामखेड चे माजी सरपंच कैलास माने यांनी त्याचे अभार मानुन सत्कार केला. या वेळी अनिल बाबर, संजय डोके, अकबर तांबोळी, पत्रकार मोहिद्दीन तांबोळी, सचिन शिंदे, मोहन पवार, अभय शिंगवी, संजय डोके, उपअभियंता संजय कांबळे व कॉन्ट्रॅक्टर गोडसे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बरोबरच आज दि १ रोजी सकाळी आमदार रोहित पवार यांनी
जामखेड शहरातील विविध विकास कामाची पाहणी व लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. तसेच शहरातील विविध भागातील दुकानांचा, हॉस्पिटल, व पतसंस्थांचे उद्घाटन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!