Friday, March 13, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्याची महसूल वसूली 84 % पूर्ण

जामखेड तालुक्याची महसूल वसूली 84 % पूर्ण

0
374

 

जामखेड न्युज – – – 

जिल्ह्यातील आकारमाणाने व लोकसंख्येने सर्वात लहान तालुका म्हणून जामखेड तालुक्याची ओळख आहे. तरीही वसुलीच्या ८४ % उद्दिष्ट तहसिल योगेश चंद्रे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे पुर्ण झाले आहे.
जमीन व गौण खनिज यातून मार्च अखेर जामखेड महसूल विभागासाठी १०० टक्के महसूल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले याची. यामध्ये प्रपत्र अ जमीन महसूल मध्ये 290 लाख तर प्रपत्र ब गौणं खनिज मधे 670 लाख असे एकुन 960 लाख एवढे उदिष्ट देण्यात आले होते. जामखेड तालुक्यातील महसूल यंत्रणे कमी कालावधीत कष्ट घेत आज अखेर सुमारे 792 लाख रुपयांची वसूल केली आहे, अशी माहिती जामखेड तहसिलदार यांनी दिली आहे.

महसूल विभागाच्या अंतर्गत जमीन महसूल, अनधिकृत अकृषक कर नजराणा प्रकरणे, मोबाईल टॉवर ” इतर कर तसेच गौण खनिज परवाने, शासकीय यंत्रणा स्वामित्व धन, अनधिकृत गौण खनिज या माध्यमातून जामखेड तालुक्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १०० टक्के जमीन महसूलीचे उद्दिष्टे देण्यात आले होते. यात जमीन महसूल पोटी 317 लाख तर गौण खनिज पोटी 475 लाख महसूल जमा झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे यांचे मार्गदर्शन, प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांचे वस्तुनिष्ठ नियोजन व मार्गदर्शन यामुळे कमी कालावधीचा वेळ मिळूनही हा जमीन महसूल जमा करण्यास जामखेड तहसील विभागाला यश आले आहे‌.

कोवीड परिस्थिती असूनही जमीन महसूल, नजराणा प्रकरण, मोजणी, कुळ कायदा प्रकरण, बिनशेती, शर्तभग, अनाधिकृत एनए, तुकडा नियमाकुल, शासकीय कामे रॉयल्टी, गौंण खनिज दंड, वाहतूक कारवाई या माध्यमातून सदर रक्कम जमा केली आहे.

निवासी नायब तहसीलदार मनोज भोसेकर, तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकार व कार्यालयीन कर्मचारी यांनी अथक प्रयत्न, मेहनतीने वसूलीपूर्ण केली. या महसूल वसूलीबद्दल उपविभागीय अधिकारी कर्जत जामखेड आणि तहसीलदार जामखेड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानत अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!