जगात सर्वात श्रेष्ठ पात्र गुरूचे आहे – रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक साकत येथिल अखंड हरिनाम सप्ताहामध्ये किर्तन

0
1807
जामखेड प्रतिनिधी
             जामखेड न्युज – – – 
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरू ॥ १॥
पडिये देहभाव पुरवी वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ २॥
मागे पुढें उभा राहे सांभाळित । आलिया आघात निवरावे ॥ ३॥
योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करी धरूनियां ॥ ४॥
तुका म्हणे नाही विश्वासस ज्या मनीं । पाहावें पुराणी विचारूनी ॥ ५॥
या तुकाराम महाराजांच्या अभंगावर आपल्या रसाळ वाणीने अनेक उदाहरणे देत निरूपण केले. जगात सर्वात महान गुरू आहे. तसेच जर प्रत्येकाला जर वाटत असेल की, आई वडील जास्त दिवस जगावेत तर भाऊ भाऊ एकत्र रहा निश्चितच आई वडिलांना मोठा आनंद मिळणार आहे.
गुरू महिमा विषयीही आपल्या रसाळ वाणीने निरूपण केले
गुरु हा संतकुळींचा राजा । गुरु हा प्राणविसावा माझा ।
गुरुविण देव नाहीं दुजा । पाहतां त्रिलोकीं ॥१॥
गुरु हा सुखाचा सागर । गुरु हा प्रेमाचा आगर ।
गुरु हा धैर्याचा डोंगर । कदाकाळीं डळमळेना ॥२॥
गुरु हा सत्यालागीं साह्य । गुरु हा साधकांसी माय ।
गुरु हा कामधेनु गाय । भक्तांवरी दुभतसे ॥३॥
गुरुहा भक्तीचें मंडण । गुरु हा काळासी दंडण ।
गुरु हा करितसे खंडण । नानापरी पापाचें ॥४॥
गुरु हा वैराग्याचे मूळ । गुरु हा परब्रह्म केवळ ।
गुरु दाखवी तात्काळ । गांठी लिंग देहाचें ॥५॥
गुरु हा घाली ज्ञानांजन । गुरु हा दाखवी निजधन ।
गुरु हा सौभाग्य देऊन । स्वात्मबोध नांदवी ॥६॥
काया काशी गुरु उपदेशी । तारकमंत्र दिला आम्हांसी ।
बाप विठ्ठल रखुमायेसी । विठ्ठल विनवी गुरुचरणी ॥७॥
   प्रतिपंढरपुर म्हणून ओळख असलेल्या व गेल्या ६७ वर्षापासुन अखंड वीणावादन व नंदादीप असलेल्या साकत मध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमत भागवतकथा ज्ञानयज्ञ सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. आज रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे यांचे किर्तन झाले. यावेळी ह. भ. प. उत्तम महाराज वराट, ह. भ. प. हरीभाऊ काळे, परमेश्वर महाराज बोधले,  कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर, सरपंच हनुमंत पाटील, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, दिनकर मुरुमकर, ईश्वर मुरुमकर
 यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
    राज्यातील नामवंत कीर्तनकारांची किर्तने या सप्ताहामध्ये झालेली आहेत यात रविवारी दि २७ रोजी विनोदाचार्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे, सोमवारी दि. २८ रोजी ह. भ. प. राधाताई महाराज सानप, मंगळवारी दि. २९ रोजी पंढरपूर येथील ह. भ. प. दत्ता महाराज हुके, बुधवार दि. ३० रोजी माजलगाव येथील ह. भ. प. मधुकर महाराज सायाळकर, गुरूवार दि. ३१ रोजी पुणे येथील शंकर महाराज शेवाळे, शुक्रवार दि. १ रोजी रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांची किर्तने झाले. तर
 शनिवार २ रोजी गुरूवर्य ह. भ. प. प्रकाश महाजन बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी संस्थान यांची किर्तन सेवा होईल तसेच शनिवार दि. २ रोजी सायंकाळी सहा ते आठ दिंडी प्रदक्षिणा होईल व रविवार दि. ३ रोजी गुरूवर्य ह. भ. प. प्रकाश महाजन बोधले यांचे काल्याचे किर्तन होईल.
    या सप्ताहामध्ये गायनाचार्य ह. भ. प. हरिभाऊ काळे, माऊली महाराज कोल्हे, आनंत महाराज बावडकर, भारती महाराज दासखेड, विजय महाराज बागडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, दिनकर महाराज मुरुमकर तसेच साकेश्वर भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक हजर राहतील.
   मृदुंगाचार्य ह. भ. प. भारत महाराज कोकाटे, भिमराव महाराज मुरुमकर, बाबा महाराज मुरुमकर, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट,, दिपक अडसुळ, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी
   चोपदार – आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे
अखंड विणा पहारेकरी – श्रीधर महाराज वराट, वसंत महाराज आडाले, सतिष मुरूमकर, बाळू भवर, टाफरे महाराज  अशा या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकारांची किर्तने व गायक वादकांची उपस्थिती राहणार आहे तेव्हा परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भिमराव महाराज मुरुमकर व बाबा महाराज मुरुमकर यांनी केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here