आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत मतदारसंघात 10 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता!

0
275

 

जामखेड न्युज – – – – 

 

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1972 पासून सरकारतर्फे बांधण्यात आलेल्या जुने पाझर तलाव, गाव तलाव तसेच विविध बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. त्यानुसार कर्जत व जामखेडमधील विविध बंधारे, पाझर तलाव इत्यादी जलसाठ्यांच्या दुरूस्तीसाठी आमदार रोहित पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुसार कर्जत व जामखेड तालुक्यातील एकत्रित एकूण 9.81 कोटी रुपयांच्या 49 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानुसार कर्जत तालुक्यातील 5 कोटी 47 लाख 74 हजार रुपयांच्या 29 कामांसाठी तर जामखेड तालुक्यातील 4 कोटी 34 लाख 3 हजार रुपयांच्या 32 कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच यासारखी मतदारसंघातील विविध कामे लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी आमदार रोहित पवार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन तसेच शासनस्तरावर वेळोवेळी योग्य तो पाठपुरावा करत आहेत. यापूर्वी देखील कर्जत जामखेडमधील 69 जलसाठ्यांच्या दुरुस्तीसाठी 11 कोटी 79 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी आमदार रोहितदादांच्या प्रयत्नातून मिळाली होती.

ADVERTISEMENT 

 

 

 

तलाव तसेच बंधारे यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात भरीव निधी मिळाला नव्हता मात्र राज्य सरकारने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी शासन स्तरावर हा मुद्दा लाऊन धरला आणि मृदा व जलसंधारण विभागाला त्यांनी मतदारसंघातील बंधारे व तलावांच्या असलेल्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर आता मतदारसंघातील जलसाठ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्तावित असलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि या कामासाठी भरीव निधी देखील मिळाला आहे. यामुळे जलसाठ्यातून पाण्याचा होणारा अपव्यव्य मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. शिवाय संबंधित पाझर तलाव, बंधारे इत्यादी देखील पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे. यामुळे मतदारसंघातील नागरिकांची पावसाळा संपला की बंधारे आटतात ही तक्रार मात्र रोहितदादांच्या प्रयत्नांमुळे कायमची मार्गी लागणार आहे.

*प्रतिक्रिया* –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तसेच मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख साहेब यांचे मी आभार मानतो यांच्यामुळे माझ्या मतदारसंघात मी मोठ्या प्रमाणात नवीन कामे मंजूर करून आणू शकत आहे. पूर्वीच्या काळात होत असलेल्या अशा कामांना योग्य तो दर्जा नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. तसेच यामध्ये आता आम्ही शेतकऱ्यांना होणारी अडचण लक्षात घेऊन कामाचा दर्जा सुधारला आहे आणि ही अडचण कायमची दूर करत आहेत. यापुढेही मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे. – *आमदार रोहित पवार*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here