जामखेड न्युज – – –
शरीराला अत्यावश्यक आणि सर्वात स्वस्त व मुबलक असलेले पाणीही आता महागाईच्या कचाट्यात सापडले आहे. शहरी भागात बाटलीबंद अथवा फिल्टर केलेले पाणी वापरणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. उत्पादन शुल्कात वाढ झाल्याने पाण्याच्या बॉटल्सही महाग झाल्या आहेत. त्यामुळे एक लिटर पाण्याच्या बॉटलसाठी एक रूपया जास्तीचा मोजावा लागत आहे. विदर्भासह शहरात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय अडचणीत सापडला होता. आता कोरोनाचे सावट कमी झाले असतानाच उन्हाळाही लागला आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याची मागणी वाढू लागली आहे. मात्र, रशिया आणि युक्रेन या देशात सुरु असलेल्या युद्धामुळे क्रूड ऑइलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे बॉटल तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयात दरात वाढ झाली. परिणामी उत्पादन शुल्कही वाढले आहे. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी रसायनेही महागली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे किंमतवाढ होय.
ADVERTISEMENT 

भारतात प्रवेश पाश्चिमात्य देशांमध्ये बाटलीबंद पाणी वापरण्यास १९ व्या शतकात सुरूवात झाली होती. भारतात हा प्रकार ७० च्या दशकात आला. पर्यटनात वाढ होत गेल्यावर त्यात वाढच होत गेली. युरोमॉनिटरच्या माहितीनुसार, आज भारतात बाटलीबंद पाण्याचे पाच हजारांहून अधिक असे निर्माते आहेत, की ज्यांच्याकडे ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्’चा परवाना आहे. आज भारतात बाटलीबंद पाण्याच्या उद्योगात सतत वाढ होत आहे.
पाणी का महागले?रसायने महागलीप्रयोगशाळेतील तपासणी शुल्कात वाढखोकी महागलीइंधनवाढीने वाहतूक खर्च वाढलाबॉटल करण्यासाठी आवश्यक प्लॅस्टिकच्या दरात वाढबाटलीबंद पाण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्चही वाढला. त्यामुळे यंदा बाटलीबंद पाण्याच्या दरात प्रति लिटर एक रुपयाची वाढ झाली आहे. – अमिताभ मेश्राम, संचालक, प्रोवेस समूह