जामखेड न्युज – – –
पोलिसांकडून जामखेड बस स्थानक परिसरात दि. २० रोजी जामखेड सायं ८.३० च्या सुमारास पिस्तूलसह दोन आरोपी जेरबंद करण्यात आले. विकास बळीराम नावगिरे
अण्णा अहिलाजी शिंदे दोन्ही रा हरकिलिंबगाव ता माजलगाव जि. बीड या दोघांना मोठ्या शिताफीने सापळा लावून आरोपींना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले.
ADVERTISEMENT 

विकास बळीराम नावगिरे व अण्णा अहिलाजी शिंदे हे दोघे जामखेड बसस्थानक परिसरात पिस्तूलसह असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना समजली यानुसार त्यांनी सापळा लावला पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचीन सगर, पोलीस कॉन्स्टेबल बाळु खाडे, पोलीस कॉन्स्टेबल श्यामगुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल विजय चव्हाण यांच्या पथकाने छापा टाकून ही धडाकेबाज कारवाई केली आहे यामुळे पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.