जामखेड प्रतिनिधी
बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार यांच्या मातोश्री सुमन दिनकर सुतार यांचे ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
सुमनताई सुतार या खुप जिद्दी महिला होत्या ४० वर्षापूर्वी त्यांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते त्यांनी यावर यशस्वी मात करत चाळीस वर्षे यशस्वी जीवन जगल्या मुलांना जिद्दीने उच्चशिक्षित केले. दिड वर्षापूर्वी पती दिनकर सुतार सर यांचे निधन झाले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या मागे एक मुलगा एक मुलगी जावाई, सुना नातवंडे असा परिवार आहे.
सुमनताई सुतार या शशिकांत सुतार यांच्या मातोश्री होत सुतार यांची नुकतीच रत्नागिरी येथे पत्तन अभियंता खाण व संरक्षण विभाग भगवती बंदर रत्नागिरी येथे पदोन्नती झाली
अंत्यविधी जामखेड येथिल अमरधाम येथे झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.