जामखेड न्युज – – – –
अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील टाकळीकडे याठिकाणी बिबट्या (Leopard) व त्याचे तीन ते चार बंछडे लोकांच्या नजरेत पडल्याने परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र वनविभाग झोपेचे सोंग घेताना दिसत आहेत तसेच वनविभागाच्या अधिकार्यांनी नागरिकांनी विविध प्रकारचे बोगस सल्ले दिल्याने नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील व-हाड देवी परिसरात बिबट्या व त्याचे तीन चार बछडे दिसले त्यामुळे नागरिकात मोठ्या प्रमाणात दहषद निर्माण झाली आहे त्यानंतर वेगवेगळ्या शंका कुशंका निर्माण केल्या जात असताना गावातील अरुण इथापे यांच्या घरासमोर
बांधलेले त्यांचे पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवला आणि त्यास ठार केले. काही अंतरावर नेवून त्या कुत्र्याचा फडश्या पडला मात्र नागरिकांची चाहूल लागताच बिबट्याने पळ काढला. मात्र पुन्हा काही काळाने परत त्या ठिकाणी येवून कुत्र्याचे उरलेले अवशेष परत नेत्याने नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याला पाचारण करण्यात आले
काही काळातच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पायाचे ठसे पहिले असता त्यांनी सदर पायाचे ठसे हे बिबट्याचेच आहेत त्यामुळे नागरिकांनी सतर्ग राहण्याचे आवाहन वन विभागाच्या
अधिकाऱ्यांनी केले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा अजब सल्ला घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाल्यावर नागरिकांनी भयभीत असल्याचे सांगितले त्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आता बिबट्या सोबत जगायला शिकले पाहिजे असा अजब सल्ला दिला आहे यामुळे नागरिकांनी वनविभागाच्या या अजब सल्ल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.