लोकवर्गणीतून साकारतोय खर्डा येथील महेबूब सुभानी दर्गा – इस्माईल शेख यांनी एक लाख एक हजार एकशे अकरा रूपये देणगी सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सरांच्या हस्ते प्रदान

0
236
जामखेड न्युज – – – 
ऐतिहासिक खर्डा शहरात बंगला गल्ली याठिकाण महेबुब सुभानी दर्गा आहे या दर्ग्याच्या नवीन बांधकाम करण्यासाठी येथील महेबूब सुभानी दर्ग्याचे भक्त इस्माईल शेख यांनी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये ची देणगी सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सर यांच्या हस्ते 29 डिसेंबर रोजी मदत म्हणून दिली आहे, त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महेबूब सुभानी यांचे नाव अब्दुल कादिर मोहिद्दिन मेहबूबे सुभानी असे आहे त्यांचा जन्म इसवी 470 साली बगदाद शरीफ येथे झाला मोहम्मद पैगंबर यांच्या नंतर धर्मप्रसारक म्हणून ते भारतात काम करीत होते महेबूब सुभानी चा संदल दरवर्षी खर्डा येथे अश्व घोडा चादर,शेरणी घेऊन काढला जातो अशाप्रकारे मोठ्या उत्साहात हा संदल साजरा केला जातो, महेबूब सुभानी दर्गा हा सर्व धर्मीय लोकांचे श्रद्धास्थान असून अनेक लोक या दर्ग्यास नवस करतात नंतर आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाली की येथे येऊन नवस फेडला जातो अशी त्याची सर्वसाधारण आख्यायिका आहे.सदर दर्ग्याच्या बांधकामास सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन शेरखान पठाण व शहाबाज शेख यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास भीमराज वाणी, शकील मोमिन,आयुब आतार,राजू लोंढे, टील्लू पंजाबी, राजू जिकरे,ओमकार इंगळे गहिनीनाथ खरात पत्रकार दत्तराज पवार इत्यादी सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here