जामखेड न्युज – – – –
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले याचा विवाह बुऱ्हानगर येथे मोठय़ा थाटामाटात पार पडला या विवाह सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते राम शिंदे, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तसेच सोहळ्याला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हा विवाह सोहळा कर्डीले यांच्या बुऱ्हानगर येथिल गावात पार पडला. कोरोना प्रतिबंधात्मक नियम भंग म्हणून आयोजकावर दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नगर पोलिसांनी आगोदरच आयोजकांना नोटीस दिली होती व कोरोना नियमावली जाहीर केली होती तरीही मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती कोरोना नियमावली पायदळी तुडवल्या प्रकरणी व कोविड प्रतिबंध नियम भंग म्हणून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.