जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जामखेड च्या वतीने भव्य वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे उद्घाटक अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT

वक्तृत्त्व स्पर्धेसाठी काही नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत वयोमर्यादा १३ ते २५ वर्षे अशी आहे. भाषण कालावधी पाच मिनिटांचा असेल, स्पर्धेत भाग घेणार्यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संपर्क कार्यालय मार्केट यार्ड गाळा नंबर २९ बीड रोड जामखेड तसेच हरिदस माने मो. नंबर 9503937307
येथे नावनोंदणी करावी.
स्पर्धेसाठी पुढील विषय ठेवण्यात आले आहेत.
१) सहकारातुन समृद्धीकडे, २) आजचा तरुण व राजकारण, ३) शेतकरी आत्महत्या, ४) स्त्री सशक्तीकरण असे विषय ठेवण्यात आले आहेत.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक शहराध्यक्ष भाजपा बिभिषण धनवडे यांच्यातर्फे ७७७७ रूपये, द्वितीय पारितोषिक पोपट जमदाडे ५५५५ रूपये, तृतीय पारितोषिक काशिनाथ ओमासे यांच्यातर्फे ३३३३ रूपये,
चतुर्थ पारितोषिक शिवकुमार डोंगरे यांच्या तर्फे २२२२ रुपये, उत्तेजनार्थ भाजपा शहराध्यक्ष युवा मोर्चा
अभिजीत राळेभात यांच्यातर्फे ११११ रुपये असे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष भाजपा अजय काशिद,
तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा शरद कार्ले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, उपसभापती रवी सुरवसे, ज्योती क्रांती पतसंस्थेचे चेअरमन आजीनाथ हजारे तसेच सोमनाथ राळेभात, अमित चिंतामणी, राजेंद्र देशपांडे, संजय कार्ले, मनोज कुलकर्णी, करण ढवळे, लहु शिंदे, गौतम उतेकर, बापुराव ढवळे, उद्धव हुलगुंडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.