जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
आज दि. २६ नोव्हेंबर रोजी सनराईज शैक्षणिक संकुलातील साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय व स्व. एम. ई. भोरे ज्युनियर काॅलेज पाडळी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून विद्यार्थ्यांनी संविधानचे वाचन केले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे, सचिव व प्राचार्या अस्मिता भोरे (जोगदंड) यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांनी संविधानाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली