श्री. अरणेश्वर विद्यालयाचे सात विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र – उज्वल यशाची परंपरा कायम

0
253
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.अरण्येश्वर विद्यालयातील पाचवीचे दोन तर आठवीचे पाच असे ७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
     महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १२ ऑगस्ट २०२१ रोजी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने नुकताच निकाल जाहीर करण्यात आला.
                        ADVERTISEMENT
       
  त्यानुसार इयत्ता ५ वी मधे संकेत सचिन गवळी (१९८ गुण), प्रतीक बळीराम ढेपे (१५४ गुण ,
   तर इयत्ता ८ वी मधील  वनश्री बाळू मिसाळ (२३४ गुण),  शुभम भरत ढेपे (१६० गुण), स्वप्नील बळीराम ढेपे
 (१४४ गुण), पार्थ शांतीलाल राऊत (१४४ गुण),
 सफिना फय्याज शेख (१३२ गुण), असे ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीसाठी मोमीन सर, चांगुणे सर, फुंदे सर, श्री. निंबोरे तर इयत्ता पाचवीसाठी करपे सर, कसबे सर, श्रीमती नवले मॅडम, दिपक तुपेरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
    गुणवंत विद्यार्थ्यांचे स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच विद्यालयाचे प्राचार्य रमेश वराट, पर्यवेक्षक  हरीभाऊ कोल्हे, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here