न्यूझीलंडकडून अफगाणिस्तानचा पराभव, भारत स्पर्धेबाहेर, किवीजची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

0
162
जामखेड न्युज – – – 
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानला मात दिल्याने ते पाकिस्तानपाठोपाठ सर्वाधिक विजयांसह सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. ज्यामुळे भारत आपोआपच स्पर्धेबाहेर पोहोचला आहे.
                        ADVERTISEMENT  
नुकताच पार पडलेला विश्वचषकातील सामना तर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होता. पण सामन्याकडे लक्ष मात्र करोडो भारतीयांचे होते. कारण आजच्या सामन्यात न्यूझीलंड पराभूत झाल्यासच भारताला सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवता आली असती. पण न्यूझीलंडने अफगाणिस्तानला    विकेट्सने मात देत विजय मिळवला आहे. ज्यामुळे पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंड सर्वाधिक विजयांसह सेमीफायनलमध्ये पोहोचला असून भारत, अफगाणिस्तान यांचा स्पर्धेतील प्रवास इथेच संपला आहे.
                    ADVERTISEMENT
भारत असणाऱ्या ग्रुप 2 मधून पाकिस्तान 4 पैकी 4 विजयांसह सर्वात आधी सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. त्यापाठी न्यूझीलंडनेही 3 सामने जिंकल्याने तो भारताच्या पुढे होता. अशावेळी न्यूझीलंडचा संघ जर आज अफगाणिस्ताविरुद्ध पराभूत झाला असता तर तोही केवळ 3 विजयासंह गुणतालिकेत राहिला असता. ज्यानंतर भारताने उद्या अर्थात 8 ऑक्टोबर रोजी नामिबीयाला नमवून न्यूझीलंड इतकेच विजय मिळवले असते. अशावेळी अफगाणिस्तान, भारत आणि न्यूझीलंड तिन्ही संघ तीन विजयांसह गुणतालिकेत असल्यास रनरेटच्या जोरावर भारतचं पुढील फेरीत पोहोचला असता. पण न्यूझीलंडने सामना जिंकल्यामुळे भारताच्या स्वप्नांवर पाणी फिरलं आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड
सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने इतर संघ विश्वचषकात करत असल्याच्या थोडे उलट करत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या उभी करुन अव्वल फिरकीपटू राशिद, मुजीब, नबीच्या जोरावर न्यूझीलंडला लवकर सर्वबाद करण्याचा त्यांचा विचार होता. पण अफगाणिस्तानचे फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी झाले. केवळ नजीबउल्लाहने 73 धावा केल्यामुळे संघ किमान 124 धावा करु शकला.
त्यानंतर  125 धावांचं लक्ष्य जे न्यूझीलंडसाठी तितकसं मोठं नव्हतं. ते त्यांनी 18.1 ओव्हरमध्ये केवळ 2 गडी गमावत पूर्ण केलं. यावेळी सलामीवीर गप्टील आणि मिचेल लवकर बाद झाले. पण कर्णधार केन विल्यमसनने नाबाद 40 आणि डेवोन कॉन्वेने नाबाद 36 धावाची खेळी करत न्यूझीलंडला 18.1 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here