साकत घाटात मालट्रकची पलटी एक जण गंभीर जखमी

0
221

जामखेड प्रतिनिधी

                          जामखेड न्युज – – – 

     जामखेड तालुक्यातील साकत घाटात आज सकाळी मालट्रकची पलटी होऊन एक एक जन गंभीर जखमी झाला आहे. ट्रकची पलटी झाल्यावर ड्रायवर व किन्नर आतमधे गुंतले होते सकाळी रोडवरून जाणाऱ्या लोकांनी कॅबीन तोडून दोघांनाही बाहेर काढले यात एक जण गंभीर जखमी झाला असून पाय मोडलेला आहे. मोठय़ा प्रमाणावर रक्त सांडलेले होते. जखमीला जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगरला पाठवले. पंधरा दिवसांत ट्रक पलटी होण्याची दुसरी घटना आहे.
                      ADVERTISEMENT
 
       बीड वरून जामखेड कडे साकत मार्गे पुठ्ठा भरलेली मालट्रक आर जे. 11 जी आर 3663 या क्रमांकाची ट्रक सकाळी चाललेली होती साकत घाटाच्या सुरूवातीलाच वेग जास्त असल्याने पहिल्याच वळणावर टर्न न बसल्याने पलटी झाली यात ड्रायवर व किन्नर आतमधे अडकले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी चालक व जोडीदाराला कॅबीन फोडून बाहेर काढले आणी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवले. केशव जाग (वय ४०) हे गंभीर जखमी झाले असून पाय मोडला आहे प्राथमिक उपचार करुन जाग यांना नगरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. ट्रक शेजारी मोठ्या प्रमाणावर रक्त पडलेले होते.
                     ADVERTISEMENT 
     साकत घाटात पंधरा दिवसांत ट्रक पलटी होण्याची दुसरी घटना आहे. घाटात संरक्षक कठडे असणे आवश्यक आहे तसेच त्यांच्यावर रेडियम लावले पाहिजे घाटात रस्ता रूंदीकरण गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here