जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी कर्जत तालुक्यातील दिघी येथे बुधवारी भेट दिली. मामाचे गाव
असलेल्या दिघीतील बालपणीच्या आठवणीत ते रममान झाले होते. देशात कोरोनाचा कहर असताना महाराष्ट्रात आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी अत्यंत जबाबदारीने जोखमीचे काम अत्यंत व्यवस्थित हाताळले. टोपे यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली असून शांत स्वभावाचे टोपे यांचे आकर्षण सर्वानाच आहे.
ADVERTISEMENT

दिवाळी निमित्त टोपे यांनी आपले आजोळ असलेल्या
कर्जत तालुक्यातील दिघीला भेट दिली. बुधवार दि 3 नोव्हे रोजी त्यांचे मामा कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक औदुंबर राजे निंबाळकर आजी सलभाताई निंबाळकर यांच्याशी कौटुंबिक गप्पा मारल्या, तसेच जुन्या
मित्रांबरोबर येथील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. अडी अडचणींबाबत सर्वांबरोबर चर्चा केली.
ADVERTISEMENT

बालपणीची दिवाळी त्यात असलेला आनंद त्यावेळचे खेळ व आत्ताची दिवाळी यातील फरक याची तुलना सर्वांबरोबर करताना, जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ टोपे यांनी ग्रामदैवत बजरंगबलीचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले, यावेळी त्याचे नातेवाईक जुन्या मित्रांबरोबर अत्यंत साधेपनांचे व्यवहार अनेकांना भावले मंत्री असूनही कुठलाही बडेजावपणा नाही की उगाच संरक्षना ची धावपळ नाही त्यामुळे त्याची ही भेट अनेकांच्या स्मरणात राहणार आहे.