जामखेड न्युज – – – –
नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शनिवारी सकाळी आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेत सात ते आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर 15 ते 20 रुग्ण गंभीर जखमी झाल्याचे समजते. प्रशासनाकडून मात्र, अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT 

नगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दलाने तसेच एमआयडीसी आणि लष्कराच्या दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, आग लागल्यावर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढले. अत्यवस्थ रुग्णांना इतर कक्षात स्थलांतरित करण्यात आले.
ADVERTISEMENT 

घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आदींसह अनेकांनी घटनास्थळ धाव घेतली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.