जामखेड न्युज – – – –
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याणविशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भावले वस्तीवर दरोडा पडला असुन दरोडेखोरांच्या मारहाणीत गोपीनाथ लक्ष्मण भावले (वय वर्षे 80) यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले (वय वर्षे 76) यादेखील या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT

घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपाधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी येऊन तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांची पथके याबाबत तपासबाबत गुन्हेगारांचा शोध घेत आहे. दरोड्यावेळी भावले वस्तीवर घरामध्ये गोपीनाथ लक्ष्मण भावले आणि शांताबाई गोपीनाथ भावले हे दोघेच होते.
ADVERTISEMENT







