सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करू – आमदार निलेश लंके

0
184
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – 
हंगा म्हटले की दंगा ही ओळख मिटवून विकासाच्या बाबतीत सर्वानी एकत्र येऊन परिसराचा कायापालट केला  सर्वांना एकत्र आणण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी प्रयत्न केले व एक आदर्श निर्माण केला. हा आदर्श पाहण्यासाठी आज जामखेड येथिल प्रा. लक्ष्मण ढेपे सर, मोहरीचे सरपंच भरत आहेर, डॉ. चंद्रशेखर नरसाळे यांनी हंगा येथे जाऊन आमदार लंके साहेबांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या व विकासाचा मंत्र समजावून घेतला.
                        ADVERTISEMENT
      आज लोकनेते आमदार निलेशजी लंके यांच्या हंगा गावी जाऊन त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा देताना प्रा. लक्ष्मण ढेपे सर, मोहरीचे सरपंच भरत आहेर,डॉ चंद्रशेखर नरसाळे व कार्यकर्ते उपस्थित होते.
                   ADVERTISEMENT  
     यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की, मी सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र उपलब्ध असतो. तुमच्या परिसरातील सर्वसामान्य लोकांच्या काही अडचणी असतील तर सांगा आपण त्या सोडवू तसेच परिसरातील कोणी गोरगरीब कोवीडचे पेशन्ट असतील तर सांगा आपण सर्व उपचारासहित राहण्याचा व जेवणाची मोफत सोय करू.
       
      गावाच्या विकासासाठी आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन विकासाच्या योजना राबवणे आवश्यक आहे असेही आमदार लंके यांनी सांगितले.
                    ADVERTISEMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here