जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
श्री रेणुकामाता मोहागड येथे परमपूज्य पांडुरंग शास्त्री देवा देशमुख सौताडा यांचे कृपाशीर्वादाने वै. विठ्ठलराव (आण्णा) राऊत यांच्या प्रेरणेने तसेच ह भ प राजेंद्र झेंडे महाराज यांच्या मार्गदर्शनाने मिती अश्विन शुक्ल 13 शके 1943 रोजी सोमवार दिनांक 18/ 10 /2021 ते बुधवार दिनांक 20 /10 /2021 पर्यंत नवचंडी महायज्ञ व कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त ह भ प बाळासाहेब महाराज गाडे, ह-भ-प महादेव महाराज डोंगरे, ह भ प महादेव गर्जे मोहा यांनी प्रवचन सेवा केली. तर ह.भ.प. महेबूब महाराज शास्त्री सौताडा आणि ह भ प राजेंद्र महाराज झेंडे मोहा यांनी कीर्तन सेवा केली तसेच अखिल भारतीय वारकरी महामंडळ उपाध्यक्ष, गिनीज बुक नोंद असलेले ह भ प रामकृष्ण रंधवे बापू महाराज यांनी काल्याचे किर्तन केले या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करून उत्सवाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास मोहा, हापटेवाडी, नानेवाडी, रेडेवाडी, पांडव वस्ती, सौताडा, भुतवडा, श्री विठ्ठल भजनी मंडळ जामखेड येथील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री मोहागड देवी ट्रस्ट व श्री विनायक विठ्ठलराव राऊत , श्री संतोष बांगर सर , उमेश काका देशमुख , मंदार कुलकर्णी , श्री संतोष शेठ पवार सिताराम दादा राळेभात , बाबासाहेब डोंगरे ,दासू रेडे नामदेव घुमरे व कमिटीतील सर्व सदस्य यांनी सहकार्य केले