जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
राहण्यासाठी ना धड घर, दोन वेळच्या खाण्याची पंचाईत लोकांची धुणी भांडे करून स्वतःची व मुलांची उपजीविका कशीबशी लोकांकडून मिळालेल्या शिळ्या पाक्या अन्नावर होत होती. यातच मुलाचा हात मोडल्याने आता काय करावे जवळ पाच पैसेही नाहीत. या विवंचनेत आसताना जामखेड येथिल निवारा बालगृहाबदद्ल माहिती मिळाली फोन केला आईला व मुलाला निवारा बालगृहात आणले व मुलाच्या हातावर डॉ. सुशील पन्हाळकर यांनी मोफत शस्त्रक्रिया केली त्यामुळे निवाराही मिळाला व मुलांच्या हातावर शस्त्रक्रियाही झाली
बदलापूर जि. ठाणे येथून अरूण आबांना फोन आला छाया वसंत मोरे गरीब परिस्थितीत हातावर पोट भरणारी धुणे भांडे करून स्वतःची व मुलांची उपजीविका करत असणारी. चार दिवस झाले तिच्या मुलाचा खेळताना हात मोडला बदलापूर या ठिकाणी 32 हजार रुपये खर्च सांगितला चार दिवसापासून तिचे कुटुंब उपाशी होते. बदलापूर मध्ये अनेक ठिकाणी फिरली तिला मदत कोणीच केली नाही मदत तर सोडा बऱ्याच ठिकाणी तिचा अपमान देखील करण्यात आला अपमानामुळे तिचे मन खचून जात होते. बऱ्याच वेळेस तिच्या मनामध्ये दोन मुलांसह आत्महत्या करावी म्हणून रेल्वेकडे गेली विहिरीकडे गेली मनामध्ये दुःखाचा काहूर पेटला होता. एक पाय पुढे एक पाय पाठीमागे एक मन म्हणायचे आत्महत्या कर तर दुसरे मन म्हणायचे तुला मुलांसाठी जगायचे हे सगळे संकट येण्या अगोदर नवऱ्याने पाच वर्षांपूर्वी माझी साथ व मुलांची सावली सोडून निघून गेला असता त्यांचा चेहरा व मुलांना सावली मिळाली नाही अशा परिस्थितीमध्ये छाया वसंत मोरे यांचा फोन आला मला मदतीची व आधाराची गरज आहे. तातडीने आम्ही संस्थापक ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव, संचालक बापू ओहोळ, अधीक्षक वैजीनाथ केसकर, प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, दिपक माळी, राजू शिंदे, द्वारका पवार व संस्थेचे स्वयंसेवक शिवाजी घाडगे कोपरगाव आम्ही सर्वांनी चर्चा केली.
तातडीने त्या महिलेला विनाविलंब मदत करून हात मोडलेल्या मुलाला त्याच्या आईला निवारा बालगृहात जामखेड येथे आणण्यात आले त्या ताईने समता भूमीतील बालगृहात प्रवेश करताच अनाथ मुलांना व संस्थेतील कार्यकर्त्यांना पाहिल्यानंतर हंबरडा फोडला डोळ्यातून अश्रू यायला लागले व म्हणाली मला जगातील कुठलीही शक्ती आता हरवू शकत नाही कारण आता मला या ठिकाणी हक्काचा निवारा आधार मिळाला आहे.
मुलाचा हात मोडल्यामुळे वेदना जास्त होत होत्या तातडीने जामखेड येथील देव माणूस डॉ फारूक अजम यांना झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी लगेच डॉ सुशील पन्हाळकर हाडाचे डॉक्टर यांच्याशी संवाद साधला व डॉक्टरांनीने कुठलाही विलंब न लावता तातडीने मुलाला घेऊन या बाकीचे नंतर बघू मुलाची व आईची परिस्थिती डॉक्टरांनी पाहिली व लगेच म्हणाले मुलाच्या व आईच्या पाठीमागे कोणी नाही मी तिचा भाऊ म्हणून खंबीरपणे उभा आहे. ऍडमिट करून लगेच दि.19/10/2021 रोजी रात्री 8:30 वाजता मुलाचे हाताचे ऑपरेशन निशुल्क केले. या ऑपरेशन साठी होणाऱ्या सर्व लॅब टेस्ट करणारे महेश यादव, नम्रता क्लिनिकल लॅब यांनी एक रुपया न घेता मोफत सर्व टेस्ट केल्या आणि मुलांचे हाताचे ऑपरेशन चांगले झाले हे महिलेच्या चेहऱ्यावर संकट दूर झालेल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं व मुलाच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आई खूप आनंदी दिसत होती. आणि उपाशी असणाऱ्या आईने निवारा बालगृहामध्ये मागून आणलेल्या धान्याची भाकर व हिरव्या मिरचीचा ठेचा वांग्याची भाजी खाल्ली हा सगळा आनंद फक्त डॉक्टर सुशील पन्हाळकर व डॉ शोयब शेख भूलतज्ञ तसेज शहाजी तागदे मेडिकल बांधव त्यांच्या कर्मचाऱ्या मुळेचं. आई म्हणाली मी जग सोडून जाण्याची ईच्छा व्यक्त केली होती. आत्ता मी हे जग सोडून जाणार नाही मी जगणार व दुसऱ्याला पण जगायचे शिकवणार.
ओ आबा तुमचा जन्म फक्त आणि फक्तचं अनाथांसाठी, निराधारांसाठी, व रस्त्याची वाट चुकलेल्या माणसांसाठीच आहे असे त्या म्हणाल्या.