जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत मंगळवार दि. १२ रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन व वसाहत परिसराची स्वच्छता केली सर्व परिसर चकाचक केला.

सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडील निर्देशन्वये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे निमित्ताने अमृत महोत्सवी भारत या उपक्रमाचे आयोजन 15 ऑगस्ट 2022 पर्यंत करायचे आहे त्याअनुषंगाने आज दिनांक
12 रोजी सकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत जामखेड पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेत 3 अधिकारी, 15 पोलीस अंमलदार , 4 होमगार्ड असे हजर होते.






