जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज ( सुदाम वराट)
आदर्श शिक्षक व वानगावचे माजी सरपंच लक्ष्मण निवृत्ती वराट (आण्णा) वय ८४ यांचे वृद्धापकाळानत अल्पशा आजाराने रविवार दि. २६ रोजी जामखेड येथे राहत्या घरी निधन झाले यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे
लक्ष्मण वराट सर हे आण्णा नावाने सर्वत्र परिचित होते. ते
खुपच कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून परिचित होते. रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा या शाखेमध्ये
३३ वर्षे एक आदर्श शिक्षक म्हणून एकाच जागी काम केले.
तसेच शिस्तप्रिय असणाऱ्या आण्णांनी वानगाव तालुका जिल्हा बीड या ठिकाणी पाच वर्षे सरपंच म्हणून काम पाहिले सरपंच पदाच्या काळात अनेक लोकोपयोगी योजना गावात राबवून पाच वर्षे आदर्श कारभार केला होता.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री अरण्येश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रमेश वराट सरांचे ते वडील होत तसेच त्यांचा धाकटा मुलगा नानासाहेब वराट यांची पुणे येथे स्वतः ची कंपनी आहे.
त्यांच्या मागे पत्नी एक भाऊ दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे, पुतणे असा खुप मोठा परिवार आहे.