Friday, September 25, 2026
Home ताज्या बातम्या २७ वर्षांची रक्तदानाची अखंड परंपरा, खैरनार फाउंडेशनचे उद्या भव्य रक्तदान शिबिर! ...

२७ वर्षांची रक्तदानाची अखंड परंपरा, खैरनार फाउंडेशनचे उद्या भव्य रक्तदान शिबिर! जामखेडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन

0
2
२७ वर्षांची रक्तदानाची अखंड परंपरा, खैरनार फाउंडेशनचे उद्या भव्य रक्तदान शिबिर!  जामखेडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन

जामखेड न्युज – – – – 

२७ वर्षांची रक्तदानाची अखंड परंपरा, खैरनार फाउंडेशनचे उद्या भव्य रक्तदान शिबिर!

जामखेडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन

जामखेड शहरातील प्रसिद्ध डॉ. कै. द. भ. खैरनार (दादा) यांच्या जन्म दिनानिमित्त कै. डॉ. द. भ. खैरनार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तब्बल २७ वर्षांपासून रक्तदानाचा हा सामाजिक उपक्रम अखंडपणे सुरू असून, यंदाच्या शिबिरालाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. कै. डॉ. द. भ. खैरनार यांच्या स्मृती आणि सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन त्यांच्या प्रेमापोटी तरुण मित्रांनी सुरू ठेवलेली ही रक्तदानाची परंपरा आता सामाजिक बांधिलकीचे रूप घेत आहे.

रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तरुण मित्रांसह माता-भगिनी आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया व गंभीर आजारांवरील उपचार घेणारे रुग्ण, थॅलेसेमिया रुग्ण तसेच गरजू माता व बालकांसाठी रक्ताची मोठी गरज असते. अशा गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

“रक्तदान—जीवनदान” या भावनेतून प्रत्येकाने सामाजिक कर्तव्य म्हणून रक्तदान करण्याचा संकल्प करावा. आपल्या एका रक्तदानातून गरजू रुग्णाला मदतीचा हात मिळू शकतो, त्यामुळे जामखेडकरांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदानाचा सामाजिक संदेश अधिक व्यापक करावा, असे आवाहन कै. डॉ. द. भ. खैरनार फाउंडेशन, जामखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रविवार, दि. २७ सप्टेंबर | सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत एक रक्तदान… अनेक जीवनांसाठी जीवनदान!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!