Home क्राईम न्यूज जामखेडमध्ये भांड्याच्या दुकानावर पोलिसांचा छापा; शेतीपंपासाठी वापरल्या जाणाऱ्या ₹९.७९ लाखांच्या १,६३५ किलो...

जामखेडमध्ये भांड्याच्या दुकानावर पोलिसांचा छापा; शेतीपंपासाठी वापरल्या जाणाऱ्या ₹९.७९ लाखांच्या १,६३५ किलो तांब्याच्या तारा जप्त कागदपत्रे सादर न केल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल; अधिक तपास सुरू

0
7

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडमध्ये भांड्याच्या दुकानावर पोलिसांचा छापा; शेतीपंपासाठी वापरल्या जाणाऱ्या ₹९.७९ लाखांच्या १,६३५ किलो तांब्याच्या तारा जप्त

कागदपत्रे सादर न केल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल; अधिक तपास सुरू

 

जामखेड शहरातील तपनेश्वर रोड परिसरातील एका स्टील व भांड्याच्या दुकानावर जामखेड पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शेतीपंपासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे ₹९ लाख ७९ हजार २०० किमतीच्या १,६३५ किलो वजनाच्या तांब्याच्या सोललेल्या तारा जप्त करण्यात आल्या आहेत.


या प्रकरणी मालाची मालकी सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे सादर न करता उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे संबंधित दुकानदाराविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मोहनलाल भंडारी (वय ४८, रा. तपनेश्वर रोड, जामखेड) यांचे साई समर्थ स्टील व भांडे दुकान आहे. या दुकानामध्ये शेतीपंपासाठी उपयोगात येणाऱ्या तांब्याच्या मोठ्या प्रमाणात सोललेल्या तारा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती जामखेड पोलिसांना मिळाली होती.


या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे व त्यांच्या पथकाने गुरुवार, दि. १६ जुलै रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजता दुकानावर छापा टाकला. छाप्यात दुकानात ठेवलेल्या ३९ गोण्यांमध्ये एकूण १,६३५ किलोग्रॅम वजनाच्या सोललेल्या तांब्याच्या लहान-मोठ्या तारा आढळून आल्या. या तारांची अंदाजे किंमत ₹९,७९,२०० असल्याचे पोलिसांनी सांगितले.

छाप्यानंतर पोलिसांनी महेश भंडारी यांच्याकडे सदर तांब्याच्या तारांबाबत मालकीचे किंवा खरेदीचे कागदपत्र मागितले. मात्र, त्यांनी कोणतीही वैध कागदपत्रे सादर केली नाहीत.

तसेच मालाबाबत समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना सदर तांब्याच्या तारा चोरीच्या असल्याचा संशय बळावला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश भंडारी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे जामखेड शहरात खळबळ उडाली असून, जप्त करण्यात आलेल्या तांब्याच्या तारांचा उगम, त्या नेमक्या कोठून आणण्यात आल्या आणि त्यांचा चोरीशी संबंध आहे का, याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!