Thursday, September 3, 2026
Home ताज्या बातम्या “गणेशोत्सवासाठी जामखेड पोलिस ॲक्शन मोडमध्ये! मंडळ अध्यक्षांसह डीजे-बँजो चालकांची उद्या बैठक”

“गणेशोत्सवासाठी जामखेड पोलिस ॲक्शन मोडमध्ये! मंडळ अध्यक्षांसह डीजे-बँजो चालकांची उद्या बैठक”

0
2
“गणेशोत्सवासाठी जामखेड पोलिस ॲक्शन मोडमध्ये! मंडळ अध्यक्षांसह डीजे-बँजो चालकांची उद्या बैठक”

जामखेड न्युज – – – – – – 

“गणेशोत्सवासाठी जामखेड पोलिस ॲक्शन मोडमध्ये! मंडळ अध्यक्षांसह डीजे-बँजो चालकांची उद्या बैठक”

आगामी गणेशोत्सव २०२६ उत्साहात, शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने उद्या शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पोलीस स्टेशन येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, गणेश मूर्तिकार, डीजे-बँजो मालक व चालक तसेच मंडप मालक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, उत्सव शांततेत पार पाडणे, मिरवणुका व ध्वनिक्षेपकासंदर्भातील नियमांचे पालन करणे तसेच प्रशासनाच्या आवश्यक सूचनांबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

गणेश मंडळांनी उत्सवाचे आयोजन करताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी पोलिसांकडून आवश्यक सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावातील गणेश मंडळांच्या अध्यक्षांपर्यंत बैठकीची माहिती पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित पोलीस पाटलांना देण्यात आली आहे.

सर्व पोलीस पाटलांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांच्या अध्यक्षांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत सूचना द्याव्यात, असेही कळविण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला संबंधित सर्वांनी वेळेत उपस्थित राहून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!