Monday, June 1, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड बसस्थानकात पाकिटमारांचा सुळसुळाट – प्रवाशांचे खिसे होताहेत रिकामे

जामखेड बसस्थानकात पाकिटमारांचा सुळसुळाट – प्रवाशांचे खिसे होताहेत रिकामे

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेड बसस्थानकात पाकिटमारांचा सुळसुळाट – प्रवाशांचे खिसे होताहेत रिकामे

जामखेड बसस्थानकावरून बारामतीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना एका अधिकाऱ्याचे पंधरा हजार रुपये असलेले पाकीट मारण्याची घटना घडली असून जामखेड बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस विभागाने या ठिकाणी पोलीस जास्त वाढवावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

काल दि. ३१ मे रोजी दुपारी ३ :३० वाजताच्या सुमारास जामखेड बस स्थानकावरून बारामतीकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना लघु पाटबंधारेचे जामखेड येथील उप-विभागीय अधिकारी पंढरीनाथ ठनके (वय ५७) हे बारामतीच्या बसमध्ये चढताना त्यांच्या पाकीटातील १५,००० रुपये आणि आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखीपत्र अज्ञात चोराने चोरून नेल्याची माहिती मिळाली.

फिर्यादीने काल व दुपारी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 359/2026 नुसार नोंद करण्यात आला असून गुन्हा भारतीय दंडसंहितेची कलम 303(2) (भारतीय न्याय संहिता कायदा 2023 अनुषंगिक) अंतर्गत चोरी म्हणून नोंदविण्यात आला आहे. पोलिस तपास करीत आहेत. सध्या आरोपी अज्ञात असून अटक झालेली नाही.

जामखेड बस स्टँड — प्रकरण तपासताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि बसमधील प्रवाशांची विचारपूस केली असल्याची माहिती मिळाली आहे. फिर्यादीने सांगितले की, पाकीटातील रक्कम आणि दस्तऐवज हे वैयक्तिक उपयोगासाठी होते. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

प्रवासाच्या वेळी महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी. असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

जामखेड तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जामखेड बसस्थानकात गेल्या १५ दिवसांपासून पाकिटमारांनी धुमाकूळ घातला आहे. ११ वी प्रवेश, सुट्टीचा हंगाम व आठवडे बाजारामुळे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांचे पाकीट, मोबाईल, दागिने लंपास करत आहेत.

चोरट्यांची मोडस ऑपरेंडी
1. गर्दीत घुसणे: बस आली की चढण्याच्या घाईत प्रवाशांना धक्काबुक्की करून खिसा कापणे.

2. लहान मुलांचा वापर: १०-१२ वर्षांच्या मुलांना पुढे करून सहानुभूती मिळवणे, मागून मोठे चोर काम करणे.

3. महिलांना टार्गेट: पर्स, गळ्यातील सोन्याची पोत सहज कापता येते.
4. बस सुरू झाली की पळ: घटना घडल्यावर आरडाओरडा होईपर्यंत चोरटे गर्दीतून पसार.

*प्रवाशांची मागणी*
1. CCTV तातडीने सुरू करा.
2. बसस्थानकात पोलीस चौकी व नियमित गस्त हवी.
3. लाऊडस्पीकरवरून ‘पाकिटमारांपासून सावध राहा’ अशा सूचना द्याव्यात.
4. संशयितांवर नजर ठेवण्यासाठी महिला व पुरुष पोलिसांची नेमणूक करा.

*दक्षता बाळगा*: बसस्थानकात पाकीट पाठीच्या खिशात ठेवू नका, दागिने सांभाळा, अनोळखी व्यक्ती अंगावर धडकली तर खिसा तपासा, घटना घडल्यास 112 किंवा जामखेड पोलीस ठाणे: 02421-222333 वर संपर्क करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!