Tuesday, June 9, 2026
Home ताज्या बातम्या वादळी वाऱ्यामुळे साकत परिसरात प्रचंड नुकसान : झाडे उन्मळून पडली, पत्रा शेड-सोलर...

वादळी वाऱ्यामुळे साकत परिसरात प्रचंड नुकसान : झाडे उन्मळून पडली, पत्रा शेड-सोलर पॅनलचा चुराडा

0
26

जामखेड न्युज – – – – – – 

वादळी वाऱ्यामुळे साकत परिसरात प्रचंड नुकसान : झाडे उन्मळून पडली, पत्रा शेड-सोलर पॅनलचा चुराडा

रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने साकत व परिसरातील गावांमध्ये प्रचंड नुकसान केले आहे. अर्धा तास झालेल्या तुफान वाऱ्यामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली, घरावरील पत्रा शेड उडून गेले, तर शेतातील सोलर पॅनलचेही मोठे नुकसान झाले.

काय-काय नुकसान झाले?
झाडे: साकत-बीड रस्त्यावर मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या आंबा, चिंच, लिंबूच्या बागा भुईसपाट झाल्या. फळ पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

घरे व गोठे : वादळाच्या तडाख्यात साकत पिंपळवाडी येथे घरावरील तसेच अनेक ठिकाणी वस्तीवरील पत्रा शेड उडून गेले. कुक्कुटपालन शेड व जनावरांचे गोठे कोसळले. सुदैवाने जीवितहानी नाही.

सोलर पॅनल : ‘कुसुम’ योजनेअंतर्गत शेतात बसवलेले सोलर पॅनल वाऱ्याने तुटून पडले. मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महादेव लहाने, नारायण लहाने यांच्या शेतातील सोलर पॅनलचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.साकत परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सोलर प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोलर पॅनेलची संरचना वाकली असून काही पॅनेल जमिनीकडे झुकल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे हे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांना आवाहन: वादळ काळात झाडाखाली थांबू नका, पत्रा शेडची तपासणी करा, विजेच्या खांबांपासून दूर राहा, जनावरे मोकळी सोडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!