जामखेड न्युज—–
जामखेडमध्ये चैन स्नॅचिंगचे प्रकार वाढले, १.५ लाखांची सोन्याची चैन हिसकावून चोरटे फरार

जामखेड तालुक्यात रविवारी (१२ एप्रिल २०२६) रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिलींदनगर, जामखेड येथील रंजना राम काळे (वय ५५ वर्षे, घरकाम, रा. मिलींदनगर, या महिलेच्या गळ्यातील ५० ग्रॅम (प्रति ग्रॅ. ₹३०००, एकूण ₹१,५०,०००) किंमतीची सोन्याची चैन अज्ञात मोटारसायकलवरील दोन इसमांनी ओढून घेतली.

नागेश शाळेसमोरून घरी जात असताना रात्री ९.१० वाजता ही घटना घडली असून, तक्रारीनुसार गुन्हा रात्री ११.४१ वाजता जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिस स्टेशन जामखेडला गु.र.क्र.: २०१/२०२६ कलम बीएनएस २०२३ कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक १२ एप्रिल रात्री ११.४१ वाजता आरोपी दोन अज्ञात इसम (अटक नाही) फरार झाले आहेत.

फिर्यादी रंजना काळे नागेश शाळेसमोरून मिलींदनगर येथील त्यांच्या घरी चालत जात होत्या. अचानक अज्ञात मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जोरात ओढली आणि वेगाने फरार झाले.

या घटनेमुळे रंजना यांना धक्का बसला असला तरी सौभाग्याने शारीरिक इजा झाली नाही. त्या घाबरून घरी पोहोचल्या आणि तात्काळ जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.




