Home क्राईम न्यूज कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्रातील पक्का खिलाडी सागर मोहळकरचे बारा दिवसाच्या उपचारानंतर अखेर...

कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्रातील पक्का खिलाडी सागर मोहळकरचे बारा दिवसाच्या उपचारानंतर अखेर निधन

0
3

जामखेड न्युज—–

कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्रातील पक्का खिलाडी सागर मोहळकरचे बारा दिवसाच्या उपचारानंतर अखेर निधन

चार मार्च रोजी रात्री 07.30 वा. चे सुमारास तपनेश्वर रोड ते खाडेनगर जाणारे रोडवरील नुराणी कॉलनी या ठिकाणी अज्ञात आरोपींनी मोटारसायकलवर येवुन पैलवान सागर किसन मोहळकर याचेवर गावठी कट्टयातुन गोळीबार करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तो बारा दिवस पुणे येथे उपचार घेत होता. अखेर आज सोमवार दि. १६ रोजी सायंकाळी ससून रूग्णालय पुणे येथील वैद्यकीय अधिकारी यांनी सायंकाळी साडेसात वाजता सागर यास मृत घोषित केले.

गोळीबार करणारा आरोपी जामखेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने अभिमन्यु महादेव पोते वय 24 वर्षे, रा. भुतवडा रोड, लाईट बोर्ड शेजारी, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेतले होते. तर पुण्यातून रोहित विठ्ठल आखाडे यास पुणे पोलीसांनी अटक केली आहे.
यामुळे दोन आरोपी अटक करण्यात आले आहेत.

सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास पोलीस तपासात सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर आला होता. तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होत. कारण त्याच्यावर याआधी खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात केलेली होती. त्याला तुरुंगवास देखील झाला होता. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तुरुंगात आणखी एकाचा खून केल्याची माहिती समोर आली होती.

सागर मोहोळकर या पैलवानावर ४ मार्च रोजी
रात्री जामखेड शहरात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. सागर मोहोळकर याला चार गोळ्या लागल्यात. त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मोहोळकरला चार गोळ्या लागूनही त्यांने बारा दिवस मृत्यूशी झुंज दिली होती. आज त्याचा मृत्यू झाला ही माहिती समोर आली आहे.

सागर मोहळकर हा नामवंत पैलवान म्हणून अनेक आखाडे गाजवले मानाच्या कुस्त्या केल्या पण याच दरम्यान तो नशेच्या आहारी गेला नशेत असताना त्याच्या कडून अनेक गैरकृत्य घडले यातून तो गुन्हेगारी क्षेत्रात आला. प्रश्न असा आहे की जामखेड सारख्या ठिकाणी त्याला नशेचे पदार्थ मिळतात हेच विशेष आहे या नशेच्या आहारी गेल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पैलवान असलेला सागर मोहोळकर हा कुख्यात गुंड आहे. त्याच्या विरोधात जामखेड तालुक्यात खंडणी, मारहाण करणे, जिवे मारणे, जीव मारण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने  निलेश घायवळ याला कानाखाली लगावली होती. मागील वर्षी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान आयोजित कुस्ती स्पर्धेत त्याने घायवळच्या कानशिलात लगावली होती.

एका हत्येच्या प्रकरणात जेलमध्ये असताना त्याने एका सहकारी कैद्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो कुस्तीचे डाव टाकून नागरिकांना उचलून फेकायचा. त्यामुळे नागरिक जायबंदी होत असत.नाशिक जेलमधून सुटल्यानंतर त्याने जामखेड येथील जुन्या भांडण्याच्या कारणातून तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. जामखेडमधील त्याच्या दहशतीमुळे तो ज्या रस्त्याने येत असेल, त्याच्या समोरून अनेक जण रस्ता बदलायचे.

काही काळापासून तो विस्मरणात गेल्यासारखं करायचा. त्याने तळहातावर नाव लिहून ठेवून समोरच्या ओळख पटवायचा. गजनी सिनेमातील हिरो हात, कागदावर नाव लिहून समोरच्याची ओळख पाठवत असे, त्याचप्रमाणे सागर देखील तळहातावरणावर लिहीत असे असे माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. त्याच्यावर बुधवारी रात्री गोळीबार झाला, त्यावेळी सुद्धा सागर याच्या तळहातावर तीन जणांची नावे लिहिली होती. आता ही नावे आरोपींची आहे का, यामध्ये अजून दुसरा काही प्रकार होता. याबाबत पोलीस तपास करत आहे.

४ मार्च बुधवारी रात्री झालेला गोळीबारात मागच्या वादाचे काही धागेदोरे आहेत का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. एवढेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी सागर मोहोळकर याच्या वडिलांनी सागर याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये महाराणीची तक्रारही केली होती. त्यामुळे आता पोलीस दोन्ही बाजूंनी तपास करत करत होते. एक आरोपी जामखेड मध्ये तर एक पुण्यात अटक करण्यात आला अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

सागर मोहोळकर कोण?
सागर मोहोळकर हा पैलवान म्हणून ओळखला जात असला, तरी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. काही वर्षांपूर्वी एका खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि तो कारागृहातही होता. तुरुंगवास भोगल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. कारागृहात असतानाही त्याच्याविरोधात आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्याची चर्चा आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!