Monday, March 16, 2026
Home ताज्या बातम्या नागेश्वर मंदिर धाकटी नदीवरील नुतन पुलाचे नगरपरिषदेच्या वतीने भूमिपूजन सहा महिन्यांपुर्वी...

नागेश्वर मंदिर धाकटी नदीवरील नुतन पुलाचे नगरपरिषदेच्या वतीने भूमिपूजन सहा महिन्यांपुर्वी अतिवृष्टीमुळे कोसळला होता पुल

0
2

जामखेड न्युज—–

नागेश्वर मंदिर धाकटी नदीवरील नुतन पुलाचे नगरपरिषदेच्या वतीने भूमिपूजन

सहा महिन्यांपुर्वी अतिवृष्टीमुळे कोसळला होता पुल

परिसरातील भाविक भक्तांना नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी धाकटी नदीवरील लोखंडी पुल सहा महिन्यांपुर्वी अतिवृष्टीमुळे कोसळला होता यामुळे शालेय विद्यार्थी, भाविक भक्त व नागरिकांना वळसा घालून दूर अंतरावरून ये जा करावी लागत होती तसेच वर्षानुवर्षे या मार्गाने तुळजापूर कडे जाणारा पलंग याच मार्गाने जात असतो. नदीला पाणी असल्यास भाविकांना अडचणीचा सामना करावा लागतो हिच अडचण ओळखून विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी नवीन पुलाची मंजुरी दिली आज नगरपरिषदेच्या वतीने पुलाचे भूमिपूजन करण्यात आले.

पुलाचे भूमिपूजन करताना नगराध्यक्ष प्रांजळ अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, सभापती श्रीराम डोके, अर्जुन म्हेत्रे, सीमा कुलकर्णी, नगरसेवक सागर टकले, विकी घायतडक, प्रविण चोरडिया, अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, प्रविण होळकर, अनिकेत बांदल म्हेत्रे महाराज यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमित चिंतामणी म्हणाले की, जामखेड चे ग्रामदैवत नागेश्वर मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकासासाठी व सुशोभीकरणासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अडीच कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामध्ये लोखंडी पुल, दशक्रिया विधी घाट, सिमेंट रस्ते यांचा समावेश होता. पण सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोखंडी पुल खचला होता. यामुळे भाविक भक्त व विद्यार्थी यांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. हीच अडचण ओळखून सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुन्हा नवीन पुलाला मंजुरी दिली आहे.

धाकटी नदीवरील हा पुल १२ फुट रूंदीचा पादचारी पुल असणार आहे. यामुळे भाविक भक्त व विद्यार्थी यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच तुळजाभवानी मातेचा बुऱ्हानगर वरून येणारा पलंग याच मार्गाने जातो. पुलामुळे आता सर्वांची सोय होणार आहे.

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे लोखंडी पुल खचला होता. त्या जागी नवीन पाच फुट रूंदीचा पुल करण्याचा आमचा मानस आहे. नक्कीच आम्हाला नागेश्वर भोलेबाबाच सद्बुध्दी देत आहेत असेच म्हणावे लागेल असेही चिंतामणी यांनी सांगितले.

नवीन पुलामुळे शालेय विद्यार्थी, भाविक भक्त, ग्रामस्थ यांना फायदा होणार आहे. सध्या शालेय विद्यार्थी यांचे खुपच हाल होत होते. आता नागेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग सुखकर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!