कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्रातील पक्का खिलाडी सागर मोहळकर
सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास पोलीस तपासात सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर आला आहे. तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. कारण त्याच्यावर याआधी खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात केलेली होती. त्याला तुरुंगवास देखील झाला होता. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तुरुंगात आणखी एकाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.
सागर मोहोळकर या पैलवानावर बुधवारी रात्री जामखेड शहरात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. सागर मोहोळकर याला चार गोळ्या लागल्यात. त्याच्यावर आता पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोहोळकरला चार गोळ्या लागूनही अद्यापही मृत्यूशी झुंज देतोय. जामखेडमध्ये गोळीबाराचा घटनाक्रम समोर आला आहे.
सागर मोहळकर हा नामवंत पैलवान म्हणून अनेक आखाडे गाजवले मानाच्या कुस्त्या केल्या पण याच दरम्यान तो नशेच्या आहारी गेला नशेत असताना त्याच्या कडून अनेक गैरकृत्य घडले यातून तो गुन्हेगारी क्षेत्रात आला. प्रश्न असा आहे की जामखेड सारख्या ठिकाणी त्याला नशेचे पदार्थ मिळतात हेच विशेष आहे या नशेच्या आहारी गेल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पैलवान असलेला सागर मोहोळकर हा कुख्यात गुंड आहे. त्याच्या विरोधात जामखेड तालुक्यात खंडणी, मारहाण करणे, जिवे मारणे, जीव मारण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने गुंड निलेश घायवळ याला कानाखाली लगावली होती. मागील वर्षी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान आयोजित कुस्ती स्पर्धेत त्याने घायवळच्या कानशिलात लगावली होती.
एका हत्येच्या प्रकरणात जेलमध्ये असताना त्याने एका सहकारी कैद्याचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो कुस्तीचे डाव टाकून नागरिकांना उचलून फेकायचा. त्यामुळे नागरिक जायबंदी होत असत.नाशिक जेलमधून सुटल्यानंतर त्याने जामखेड येथील जुन्या भांडण्याच्या कारणातून तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली. या मारहाणीचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मात्र याप्रकरणी त्या तरुणांनी पोलिसांमध्ये कोणतेही तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जामखेडमधील त्याच्या दहशतीमुळे तो ज्या रस्त्याने येत असेल, त्याच्या समोरून अनेक जण रस्ता बदलायचे.
काही काळापासून तो विस्मरणात गेल्यासारखं करायचा. त्याने तळहातावर नाव लिहून ठेवून समोरच्या ओळख पटवायचा. गजनी सिनेमातील हिरो हात, कागदावर नाव लिहून समोरच्याची ओळख पाठवत असे, त्याचप्रमाणे सागर देखील तळहातावरणावर लिहीत असे असे माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. त्याच्यावर बुधवारी रात्री गोळीबार झाला, त्यावेळी सुद्धा सागर याच्या तळहातावर तीन जणांची नावे लिहिली होती. आता ही नावे आरोपींची आहे का, यामध्ये अजून दुसरा काही प्रकार होता. याबाबत पोलीस तपास करत आहे.
बुधवारी रात्री झालेला गोळीबारात मागच्या वादाचे काही धागेदोरे आहेत का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. एवढेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी सागर मोहोळकर याच्या वडिलांनी सागर याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये महाराणीची तक्रारही केली होती. त्यामुळे आता पोलीस दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.
सागर मोहोळकर कोण? सागर मोहोळकर हा पैलवान म्हणून ओळखला जात असला, तरी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. काही वर्षांपूर्वी एका खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि तो कारागृहातही होता. तुरुंगवास भोगल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. कारागृहात असतानाही त्याच्याविरोधात आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, एप्रिल २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरूड येथे जत्रेदरम्यान आयोजित कुस्ती स्पर्धेत सागरने भर मैदानात एका व्यक्तीच्या कानाखाली लगावल्याची घटना मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. गावात दोन वेगवेगळे कुस्ती फड सुरू होते. त्यावेळी सागरने कुस्ती लावण्याची मागणी पंचांकडे केली होती; मात्र आधीच नियोजित कुस्त्यांमुळे त्याची मागणी फेटाळण्यात आली. यातून वादंग झाले होते. नामवंत पैलवान ते गुन्हेगार असा घटना क्रम त्याच्या नावावर आहे.