Sunday, August 23, 2026
Home शैक्षणिक बातम्या गुणवत्ता धारक शिक्षक व विद्यार्थ्यांनी ल. ना. होशिंग चा सन्मान राज्य व...

गुणवत्ता धारक शिक्षक व विद्यार्थ्यांनी ल. ना. होशिंग चा सन्मान राज्य व राष्ट्रीय पातळीवर वाढवला – राजेश मोरे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन

0
109

जामखेड न्युज——-

गुणवत्ता धारक शिक्षक व विद्यार्थ्यांनी ल. ना. होशिंग चा सन्मान राज्य व राष्ट्रीय पातळीवर वाढवला – राजेश मोरे

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन

गेल्या 75 वर्षापासून दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अनेक गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक राज्य व राष्ट्रीय पातळीवर वाढवला आहे. यामुळे तालुक्याच्या नावलौकिकास भर पडली आहे असे मत माजी खजिनदार राजेश मोरे यांनी व्यक्त केले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी राजेश मोरे बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव अरूणशेठ चिंतामणी तर प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पुराणे होते. यावेळी संस्थेचे सहसचिव डॉ. सुनील कटारिया, संचालक दिपक होशिंग, डॉ. प्रताप गायकवाड, शिवाजी कासार, माजी खजिनदार राजेश मोरे, सैफुल्ला खान, प्राचार्य बी ए. पारखे, माजी प्राचार्य रमेश अडसुळ, शहाजी वायकर, उपप्राचार्य प्रा. युवराज भोसले, हनुमंत महाराज निकम, उप मुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, उगले नाना, वैभव कुलकर्णी, समारंभ विभाग प्रमुख नरेंद्र डहाळे, आदित्य देशमुख यांच्या सह अनेक गुणवंत शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेश मोरे म्हणाले की, आपल्या गुणवत्तेने अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपला ठसा राज्यात नव्हे तर देशात उमटवला आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील पुराणे म्हणाले की, पारितोषिक वितरण हे निमित्त असते यामुळे बाकी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपले नावलौकिक करावे तसेच यशस्वी जीवनासाठी आपल्या पाल्यांना नियमित शाळा महाविद्यालयात पाठवावे
येथे शिक्षकच पैलू पाडण्याचे काम करतात.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी. ए. पारखे यांनी करताना शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला व 75 वर्षाची परंपरा सांगितली शैक्षणिक, क्रीडा, कला, विज्ञान, सांस्कृतिक विभागाचा आढावा घेतला तसेच आनंदी शनिवार अभिनव उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थाबरोबरच क्रीडा शिक्षक प्रल्हाद सांळुखे गोळा फेक राज्य पातळीवर प्रथम तसेच रोहित घोडेस्वार राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड, बबन राठोड विज्ञान विभाग प्रमुख आदर्श शिक्षक पुरस्कार यांच्या बदल सविस्तर माहिती दिली तसेच वार्षिक पारितोषिक दहावी प्रथम क्रमांक विद्यार्थी, बारावी कला, वाणिज्य, विज्ञान बारावी प्रथम क्रमांक यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल देडे, प्रा. प्रमिला पोकळे, पुजा भालेराव यांनी केले तर आभार प्रा. युवराज भोसले यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!