माझा फोननंबर ब्लॉक का केलास म्हणत नृत्यांगना महिलेवर कोयत्याने हल्ला, महिला गंभीर जखमी, जामखेड परिसरात खळबळ
तु मला फोनवर बोलत का नाही, माझा नंबर ब्लॉक का केला या रागातुन एकाने नृत्यांगना असलेल्या महिलेवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात नृत्यांगना गंभीर जखमी झाली असुन तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नृत्यांगना गायत्री तुषार सावंत, रा. वाघोली. जिल्हा पुणे, (हल्ली रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) ही तिची मैत्रिण मनिषा प्रकाश जावळे हिचे सोबत जामखेड शहरातील तपनेश्वर भागात एकत्र राहते. फिर्यादी ही नृत्यांगनाचे काम करून तिची उपजिवीका भागवते. मागील पाच वर्षा पासून तिचा आरोपी मित्र राहूल अशोक कचरे रा. खळेगाव, ता. गेवराई जि. बीड याचे सोबत मैत्रीचे संबध होते. मात्र सध्या 2024 सालापासून पासुन हे मैत्रीचे संबध सध्या नाहीत. यापुर्वी देखील फिर्यादी महिलेने आरोपी राहुल कचरे त्याच्यावर एक गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवार दि.05 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास फीर्यादी महीलेस आरोपी राहुल कचरे याने फोन केला व तो म्हणाला की, तु माझ्याशी फोनवर बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु जर बोलली नाही तर मी तुला मारीन अशी धमकी दिली होती. त्यावेळी फीर्यादी महीलेने त्याचा फोन कट केला होता.
त्यानंतर शुक्रवार दि. 06 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 02 वाजण्याच्या च्या सुमारास फिर्यादी गायत्री सावंत ही आपल्या रूमवर मैत्रिण मनिषा जावळे हिचेसोबत होती. त्यानंतर मैत्रिण मनिषा हि बालकणीत गेली असता तेथे राहूल कचरे हा दडुन बसला होता. यानंतर तो फिर्यादी गायत्री हीच्या रूममध्ये आला त्यावेळी त्याच्या हातात कोयता होता, तेव्हां तो फीर्यादी गायत्रीस म्हणाला की, तु माझ्याशी का बोलत नाही? माझा नंबर का ब्लॉक केला? असे म्हणून त्याने फिर्यादी महिलेवर कोयत्याने बोटांवर, हातावर व डोक्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यावेळी तिची मैत्रिण मनिषा जावळे हिने त्यास मारू नको अशी विनंती केली होती. मात्र फीर्यादीस शिवीगाळ करत म्हणाला की, मी तुला संपवून टाकणार आहे अशी धमकी दिली व निघून गेला.
या प्रकरणी गायत्री तुषार सावंत वय 26 वर्षे धंदा, नृत्यांगना रा. वाघोली ता. जि. पुणे हल्ली रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड जि. अहिल्यानगर हीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी राहूल अशोक कचरे, रा. खळेगाव ता. गेवराई जि. बीड याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या आरोपी हा फरार आसुन पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वर्षा जाधव या करित आहेत.