जामखेड न्युज—–
जामखेडच्या वाहतूक कोंडीस अतिक्रमणेच कारणीभूत – अवधुत पवार
फक्त जामखेड चेच अतिक्रमणे का निघत नाहीत
जामखेड शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. बस स्थानकापासून ते शासकीय दुध संघापर्यंत दररोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. एक किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी दोन तास वाहतूक कोंडीत वाहने अडकत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्यावरील जामखेड वगळता इतर सर्व ठिकाणचे अतिक्रमणे निघालेली आहेत. नेमके जामखेड चे अतिक्रमण का निघत नाही यामुळे सध्या वाहतूक कोंडी चा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी साठी अतिक्रमणेच जबाबदार आहेत. अतिक्रमण हटविण्यासाठी लवकच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा अवधुत पवार यांनी दिला आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याची शासकीय हद्द हि रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फुट) अंतरापर्यंत आहे. रस्ताच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम हे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने शहराचा विकास खुंटला आहे.
जामखेड शेजारी आष्टी, पाटोदा, तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अतिक्रमणे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्यावरील जामखेड वगळता सर्व अतिक्रमणे हटवली आहेत फक्त जामखेडच अपवाद आहे. तेव्हा जामखेड शहरातील काही अतिक्रमणे निघाली पण काही मोठमोठ्या लोकांची अतिक्रमणे तशीच आहेत. यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या कायमचीच झाली आहे. नेमके ठेकेदार कोणाचेच ऐकत नाही. अतिक्रमणे निघत नाहीत. याला अभय कोणाचे आहे. याचीच चर्चा सुरू आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग काम करताना गटारांचे काम कसे का असेना झाले आहे. अनेक ठिकाणी वाकडे तिकडे गटार झाले आहे.
गटाराबाहेर नगरपरिषदेची दहा फूट जागा आहे पण सध्या अनेक ठिकाणी गटारावर पक्के काम करून टपऱ्या टाकल्या आहेत. आणि विशेष म्हणजे अनेक मोठ मोठ्या लोकांनी भाड्याने दिल्या आहेत. तेव्हा नगरपरिषद हे अतिक्रमण केव्हा हटवणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.





