Sunday, February 1, 2026
Home राजकारण युवा नेते आकाश बाफना यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्यात शिवसेना अँक्शन मोडवर ...

युवा नेते आकाश बाफना यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्यात शिवसेना अँक्शन मोडवर नान्नज व जवळा येथे शिवसेनेच्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

0
5

जामखेड न्युज——-

युवा नेते आकाश बाफना यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्यात शिवसेना अँक्शन मोडवर

नान्नज व जवळा येथे शिवसेनेच्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

 

जामखेड तालुक्यात युवा नेते आकाश बाफना यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद निवडणुकीपासून शिवसेना अँक्शन मोडवर आलेली दिसून येत आहे. आता आपले लक्ष्य ग्रामीण भागात वळवले असून तालुक्यात घराघरात शिवसेना पोहचण्याचा निर्धार युवा नेते आकाश बाफना यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील जवळा येथे शिवसेनेच्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले तसेच उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जामखेड तालुका शिवसेना युवा नेते आकाश बाफना, तालुका उपप्रमुख व जिल्हा परिषद जवळा गटाचे इच्छुक उमेदवार नितीन कोल्हे, युवासेना तालुका प्रमुख प्रविण बोलभट उपस्थित होते. तसेच जेष्ठ नेते कैलास अण्णा जाधव, बबन तात्या वाळुंजकर, दत्तात्रय दळवी, नवनाथ पाचरने, शिवकुमार डोंगरे, अशोक कुमटकर, मोहन देवाकते, किरण मराळ आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती होती. 

जवळा शाखा प्रमुख सुदर्शन मते, जवळा युवासेना प्रमुख सचिन बोराटे, नान्नज शाखा प्रमुख भीमा मोहळकर तसेच नान्नज युवासेना प्रमुख छगन मोहळकर यांच्यासह जवळा–नान्नज परिसरातील ग्रामस्थ, जामखेड तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीवर भर देत आगामी काळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शाखा क्र. 1- जवळा

शिवसेना शाखाप्रमुख : सुदर्शन हिरालाल मते, युवासेना शाखाप्रमुख : सचिन सोपान बोराटे, शिवसेना उपशाखाप्रमुख मुकेश यमाजी आव्हाड, युवासेना उपशाखाप्रमुख युवराज शिवाजी मेहर, इतर पदाधिकारी व शिवसैनिक अजय वाळुंजकर, पांडू आगम, सुनील कथले, अजय पवार, अतुल हजारे, अतुल देवमाने, पांडू सरोदे, पोपट वाघमारे, कुलदीप पवार आदी.

शाखा क्र. 2- नान्नज

शिवसेना शाखाप्रमुख मोहळकर सावता भीमा, युवासेना शाखाप्रमुख : हरी छगन मोहोळकर, शिवसेना उपशाखाप्रमुख अमोल नवनाथ राऊत, युवासेना उपशाखाप्रमुख संकेत श्रीमंत मोहोळकर, इतर पदाधिकारी व शिवसैनिक-भाऊ मोहोळकर, संदीप मोहोळकर, सुधीर काळे, विठ्ठल भुजबळ, आवा मलंगनेट, अनंत पवार, धनु मोहोळकर, गणेश गोटे, गणेश माकोडे, गणेश राजपूत, युवराज हजारे, दत्ता हजारे आदी उपस्थित होते.

जवळा व नान्नज गावांतील शिवसेना शाखांच्या उद्घाटनामुळे या भागातील राजकीय व सामाजिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील जनतेच्या समस्या थेट शाखेमार्फत मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. जिल्हा परिषद जवळ गटाचे नेते नितीन कोल्हे यांनी शाखा उभारणीसाठी मोठे प्रयत्न करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!