जामखेड न्युज——
जामखेड मध्ये ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली तरूणाचा मृत्यू
ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर आणि टेललॅम्प लावावेत – सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी
सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. अनेक ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर आणि टेललॅम्प नाहीत. यामुळे अनेक अपघात होतात. जामखेड येथील कर्जत रोडवरील अपघातात तरूणाचा मृत्यू झाला आहे.
तेव्हा अपघात टाळण्यासाठी ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर आणि टेललॅम्प लावावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.

३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कर्जत रोडवर उसाच्या डबल ट्रॅक्टर ट्रॉली खाली एक मोटर सायकल वरील अविनाश विक्रम आढाव वय ३० राहणार धानोरा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर हा धडकून जबर जखमी झाला घटनेची माहिती संदीप सांगळे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी ताबडतोब दीपक भोरे आणि ऋषीकेश शेळके यास रुग्णवाहिका घेऊन पाठवले.

जामखेड तालुक्यातील मोटरसायकल वरून येत असताना ट्रॅक्टर डबल ट्रॉल्या त्याला लक्षात आली नाही आणि तो फरफरट १०० फूट फरपटत गेल्यामुळे तो जबर जखमी झाला.

पाय तुटून साईडला पडला ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या लक्षात न आल्याने त्याच्या पायाचा चेंदा रेंदा झाला दवाखान्यात आणला परंतु त्याचा मृत्यू झाला.






