Home ताज्या बातम्या जामखेड मध्ये अतिक्रमण हटाव साठी सर्व पक्षीयांचा पाठिंबा तरीही अतिक्रमण हटाविण्यास अडचण...

जामखेड मध्ये अतिक्रमण हटाव साठी सर्व पक्षीयांचा पाठिंबा तरीही अतिक्रमण हटाविण्यास अडचण काय ? अतिक्रमण निघत नसेल तर आम्हाला टपऱ्या टाकू घ्या – टपरीधारक

0
16

जामखेड न्युज—–

जामखेड मध्ये अतिक्रमण हटाव साठी सर्व पक्षीयांचा पाठिंबा तरीही अतिक्रमण हटाविण्यास अडचण काय ?

अतिक्रमण निघत नसेल तर आम्हाला टपऱ्या टाकू घ्या – टपरीधारक

अतिक्रमण हटाव साठी सुरू असलेल्या अवधूत पवार यांच्या उपोषणाला सर्व पक्षासह नागरिकांचा पाठिंबा तरी अतिक्रमण हटाव साठी अडचण काय? असाच सवाल सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत. तसेच काही टपरीधारकांनी सांगितले की, अतिक्रमण हटवले नाहीत तर आम्हाला टपरी टाकण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी एका टपरीधारकांने जामखेड न्युजशी बोलताना केली.

राष्ट्रीय महामार्ग 548-D प्रकरणी सुरू असलेल्या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले भाजपानेही जाहीर पाठिंबा दिला आहे वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, मनसे, प्रहार तसेच डॉक्टर असोसिएशन, वकिल असोसिएशन, संभाजी ब्रिगेड, त्रिदल माजी सैनिक संघटना यांच्या सह सर्व पक्षीयांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तरीही अतिक्रमण हटाविण्यास अडचण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला अडथळा ठरत असलेले अतिक्रमण हटवावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार उपोषणाला बसले आहेत अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. शेवटी राष्ट्रीय महामार्ग अभियंता चेमटे यांनी चार तारखेपासून हद्द निश्चित करण्यात येईल असे सांगितले तेव्हा उपोषण मागे घेतले व सध्या साखळी उपोषण सुरू आहे याला सर्व पक्षीयांचा पाठिंबा आहे तरीही अतिक्रमण निघत नाही हे विशेष आहे.

सध्या शहरात अतिक्रमणाच्या विषयावर आंदोलन सुरू आहे. रस्ता रुंदीकरण आणि कारवाईच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले आहे. काही जण माणुसकीच्या नावाने भूमिका मांडत आहेत, तर काही जण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहेत. यामुळे एका टपरीधारकांने आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की आमच्या दोनशे टपऱ्या एका दिवसात जमिनदोस्त केल्या मोठ्या इमारती तशाच आहेत. त्या आता शहर विकासासाठी तसेच राष्ट्रीय महामार्गासाठी अडथळा निर्माण होत असलेले अतिक्रमणे हटविताना दुजाभाव होताना दिसत आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D लगतची अतिक्रमणे व कामातील अनियमिततेविरोधात सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी सुरू केलेल्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

शहराच्या सुरक्षिततेचा, व्यापारी पेठेच्या हिताचा आणि पारदर्शक विकासाचा प्रश्न लक्षात घेता हे आंदोलन रास्त असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. राष्ट्रीय महामार्गालगतची पक्की अतिक्रमणे हटविणे, मंजूर आराखडा सार्वजनिक करणे तसेच कामातील अनियमिततांची सखोल चौकशी करणे, या मागण्या योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घेऊन अतिक्रमणांविरोधात ठोस कारवाई करावी, अन्यथा पक्ष तीव्र आंदोलन छेडले, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, शहाजी काका राळेभात, सरपंच बाप्पुसाहेब कार्ले, अमर चाऊस, पत्रकार दत्तराज पवार, रंगनाथ राळेभात, हनुमंत मोरे, दीपक घायतडक, राळेभात, संभाजी मुळे, गणेश ढगे आदी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!