भोरे वस्ती दोन महिन्यांपासून अंधारात, अनेक ठिकाणी तुटलेल्या तारा, महावितरणचा सावळागोंधळ आमदार खासदार यांच्या आदेशाला महावितरणकडून केराची टोपली

0
351

जामखेड न्युज—–

भोरे वस्ती दोन महिन्यांपासून अंधारात, अनेक ठिकाणी तुटलेल्या तारा, महावितरणचा सावळागोंधळ

आमदार खासदार यांच्या आदेशाला महावितरणकडून केराची टोपली

जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील भोरे वस्ती एक महिन्यांपासून अंधारात आहे. तर गावातील ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने दहा दिवसांपासून थ्री फ्येजची अडचण आहे. वस्ती वरील नागरिकांची संपूर्ण दिवाळी अंधारात गेली आहे.

ग्रामस्थांनी ही अडचण विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार यांना सांगितली त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले पण महिना झाला तरी महावितरण कडून कसलीही हालचाल नाही. यामुळे आमदार खासदार यांच्या आदेशाला महावितरणकडून केराची टोपली दाखवली आहे.

सध्या तालुक्यातील अनेक गावात वीजेचा लपंडाव सुरू असतो. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होणे, गावात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत आकडे अशी परिस्थिती आहे. तसेच अनेक ठिकाणी लाईटच्या तारांना झोळ आहेत. याचीही दक्षता घेतली जात नाही.

वादळांमुळे पोल पडणे, तारा तुटणे याचीही दक्षता घेतली जात नाही. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. काही महिन्यांपूर्वी बाळगव्हान येथे तुटलेल्या ताराला चिटकून बाप लेकांचा मृत्यू झाला होता. तरीही महावितरण काळजी घेत नाहीत.

देवदैठण गावठाण डीपी घोटाळा झाल्याने आठ दिवस गाव अंधारात 19/10/2025 रोजी नवीन डीपी आली त्याच्यात काही तरी प्रॉब्लेम आला आहे.

तसेच देवदैठण भोरे वस्ती डिपी दोन महिने बंद पडली होती 2/10/25 नवीन डीपी आली होती काहीतरी केबल मध्ये किरकोळ प्रॉब्लेम आहे त्या त्यामुळ दोन महिने पासून अंधारात आहे व सर्व लोकप्रतिनिधी फोन करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी फोन द्वारे ग्रामस्थांनी सांगितले तरीही भोरे वस्तीवरील दिवाळी अंधारात गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here