सावधान!! उघड्यावर शौचास बसाल तर कारवाई करणार – गटविकास अधिकारी शुभम जाधव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत साकतमध्ये स्वच्छता अभियान व वनराई बंधारा दुरूस्ती
सावधान!! उघड्यावर शौचास बसाल तर कारवाई करणार – गटविकास अधिकारी शुभम जाधव
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत साकतमध्ये स्वच्छता अभियान व वनराई बंधारा दुरूस्ती
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार सामुदायिक श्रमदान, वनराई बंधारा, स्वच्छता अभियान यासाठी जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथक सकाळी साडेपाच वाजता साकतमध्ये दाखल झाले. सर्वात आगोदर विद्यालय रोडवर उघड्यावर शौचास बसणारे सुमारे आठ ते दहा जण पकडले त्यांना ग्रामपंचायत समोर आणून ग्रामस्थांसमोर गुलाब पुष्प देऊन आता उघड्यावर शौचास जावू नका म्हणून तंबी दिली.
उघड्यावर शौचास जाणाऱ्या विरोधात अभियान सुरूच राहिल जे ऐकणार नाहीत त्यांच्या वर कडक कारवाई करण्यात येईल तसेच त्यांनी जर शौचालय बांधकाम करण्यासाठी शासकीय अनुदान घेतलेले असेल तर ते वसुल केले जाईल. असेही गटविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव, विस्तार अधिकारी कैलास खैरे, सिध्दनाथ भजनावळे , शंकरराव गायकवाड, मल्हारी इसारवडे, सुनिल मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत शिंदे, ग्रामसेवक बी. एम शिंदे सह सर्व ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहायक व पंचायत समिती कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता अभियान या अंतर्गत उघड्यावर शौचास जाणाऱ्या दहा जणांना पकडून योग्य ती समज देण्यात आली. तसेच ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता अभियानात राबविण्यात आले. यावेळी स्वतः गटविकास अधिकारी यांनी साफसफाई करत कचरा भरू लागले. यामुळे सर्वांनीच स्वच्छता केली. उघड्यावर शौचास जाणाऱ्या दहा जणांच्या हातात गुलाब पुष्प देत पुढे उघड्यावर जाल तर कडक कारवाई करणार आशी ताकीद देण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती जामखेड तर्फे कोल्हेवाडी येथे फुटलेला वनराई बंधारा श्रमदान करून अडवण्यात आला.
यावेळी संपूर्ण टीम बरोबर पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर यांनी ही स्वच्छता अभियान व वनराई बंधारा अडवण्यासाठी श्रमदान केले.