बाफना परिवाराच्या वतीने गेल्या तीस वर्षांपासून निघणाऱ्या जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात प्रस्थान

0
180

जामखेड न्युज——-

बाफना परिवाराच्या वतीने गेल्या तीस वर्षांपासून निघणाऱ्या जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात प्रस्थान

वै. बाबामहाराज सातारकर व ह.भ.प प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीपशेठ बाफना व परिवाराच्या वतीने कार्तिकी एकादशीला जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे गेली तीस वर्षे हा नेत्रदीपक दिंडी सोहळा पार पडत आहे

जामखेड शहरातील विठ्ठल भजनी मंडळ व पंचक्रोशीतील महाराज मंडळी गुणीजन गायक वादक व टाळकरी भाविक भक्त या दिडींत सहभागी होत आसतात आज रोजी सकाळी विठ्ठल मंदिर येथे आकाश बाफना व पायलताई बाफना यांच्या हस्ते विना पुजन करुन दिंडीचे प्रस्थान झाले टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी छत्रपती शिवाजी महाराज पेठ मार्गी दिलीप मशनरी समोर दिंडीचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी बोलताना दिंडीचे मुख्य प्रवर्तक दिलीपशेठ बाफना म्हणाले की हे विठुराया आमच्या कुटुंबीयांनी सुरू केलेली दिंडीची परंपरा सैदव सुरू ठेवण्याच आशिर्वाद आमच्या पुढच्या पिढीला मिळु दे!आणि त्यांच्या हातुन वारकरी सांप्रदायाची सेवा घडु दे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे

तसेच आकाश बाफना यांनी सांगितले की विठ्ठल भजनी मंडळाच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा गेली तीस वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे हा सेवेचा वारसा मला कुटुंबियांकडुन लाभला आहे “माझ्या वडीलांची मिरासी गा देवा! तुझी चरण सेवा पांडुरंगा!!
या संत वचनाप्रमाणे वडीलांनी घालुन दिलेल्या परमार्थीक मार्गावर चालुन वारकर्‍यांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत राहील असे सांगितले

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपशेठ बाफना, जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, सावता परिषदेचे हरिभाऊ बेलेकर, दिंडी चे आयोजक आकाश बाफना, अनिल बाफना,मिथून बाफना, महेश नगरे, चंद्रकांत ढाळे, मोहन ढाळे, अशोक बोरा,शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार डोंगरे,हभप पंढरीनाथ (महाराज) राजगुरु,हभप विजय (महाराज) बागडे, दादा (महाराज) आजबे, पांडूरंग (महाराज) आजबे, नारायण (महाराज) दौंड, हभप महारूद्र नागरगोजे,हभप संतोष राळेभात, हभप अर्जुन रासकर(सर), हभप विवेकानंद महाराज मंजरतकर, विनायक राऊत, पांडुरंग माने, दशरथ निमोणकर, नगरसेवक गणेश आजबे,प्रविण राळेभात, रोशन बाफना,उमेश राळेभात, सुरेश भोसले, निलेश पारख, सौ.पायलताई आकाश बाफना, प्राजक्ताताई भोसले, सरिताताई गायकवाड आदी भजनी मंडळ व वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here