राज्याचे नेतृत्व करणारे जामखेडचे दोन नेते तरीही जामखेड समस्याच्या विळख्यात
राज्याचे नेतृत्व करणारे दोन दिग्गज नेते जामखेड ला लाभलेले आहेत. तरीही अनेक समस्या जामखेड करांच्या नशिबी आहेत. आठ दिवसातून एकदा पाणी, शहरांतर्गत व बाहेरील रस्त्यांची दुरावस्था, शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य, सांडपाण्याची समस्या, शहरात मोकाट जनावरे व कुत्र्यांचा सुळसुळाट, अतिक्रमणे, रखडलेला राष्ट्रीय महामार्ग वेगवेगळ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची चाळणी असे कितीतरी प्रश्नांचा जामखेड करांना सामना करावा लागत आहे.
जामखेड शहरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाऊस आला की, चिखल उघडला की, फुपाटा यामुळे सगळीकडे समस्याच समस्या आहेत. बीड रोडवर फुफाट्यामुळे अनेकांना फुफुसांचे आजार झाले आहेत. शहरात मोकाट कुत्रे, जनावरे व डुक्करांचा मुक्त संचार रस्त्यावर आहे. यामुळे डासांची संख्या वाढली असून डेंग्यू मलेरिया साथीची आजार वाढले आहेत. शहरातील रस्त्यावर सगळीकडे चिखल व दलदल आहे. जामखेड नगरपरिषद म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा आशी अवस्था निर्माण झाली आहे. लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याने अनेक मुले गंभीर जखमी झाले आहेत. तर भटक्या कुत्र्यांच्या हल्यात अनेक मुले, नागरिक जखमी झाले आहेत. भटके कुत्रे, मोकाट जनावरे, डुक्करांचा उपद्रव यामुळे जामखेड कर हैराण झाले आहेत. ताबडतोब मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
आमदार रोहित पवार यांना वाटत आहे मी एवढे विकास कामे करून फक्त १२४३ मतांनी निवडून आलो यामुळे नाराज तर सभापती प्रा राम शिंदे यांना वाटत आहे मी तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला तरी जनतेने मला १२४३ मतांनी पराभूत केले म्हणून तेही नाराज यामुळे अडीच वर्षांपासून रखडलेला रस्ता, रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण, शहरातील अस्वच्छता, रखडलेली पाणीपुरवठा योजना, आठ दिवसाआड मिळणारे पाणी आता येथुन पुढे फुफाट्याचा त्रास, तालुक्यातील अनेक रिक्त पदे यामुळे जनता हैराण झाली आहे. जामखेड ला वाली कोण असा प्रश्न विचारला जात आहे.
शहरातील गल्ली बोळीत कचऱ्याचे ढिग आहेत. गटारांचे पाणी रस्त्यावर असते तसेच अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचलेली आहेत. यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. तसेच शहरातील राष्ट्रीय महामार्ग काम बंद आहे पाऊस असलाकी पाण्याचे डबके व पाऊस उघडला की फुफाटा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
जामखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. गल्लोगल्ली ही संख्या वाढत असून, नागरिकांना त्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. ही कुत्री अंगावर येत असल्याने लहान मुले व वयोवृद्धांना शहरातून वावरताना दक्षता घ्यावी लागते. मोटारसायकलस्वारांच्या मागे कुत्री लागत असल्याने मोटारसायकल चालविताना कसरत करावी लागत आहे. नगरपरिषदेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. कुत्रे, डुकरे यांच्या उपद्रवाबरोबरच घाणीच्या साम्राज्य मुळे डासांचा उपद्रव वाढला आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. आता तर बंदच आहे. दुभाजकासाठी ठेवलेल्या जागेतील माती कमी झाल्याने खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात होतात. काही ठिकाणी सिंगल पट्टी तर काही ठिकाणी अर्धवट रस्ते आहेत यामुळे वाहतूक कोंडी होते यातच रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. मोकाट जनावरे ही रस्त्यावर मधोमध बसलेले असतात. एखाद्या नागरिकांने त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते अंगावर धावून येतात. कुत्रे तर मोटारसायकल मागे लागल्याने अनेक मोटारसायकल स्वार घसरून पडून जखमी झाले आहेत.
सध्या शहरात कुत्र्यांच्या झुंडी मोकाट जनावरे, डुक्करांचा मुक्त संचार नेहमीचाच झाला आहे. कधी कधी तर पंधरा ते वीस कुत्र्याच्या झुंडी च्या झुंडी रस्त्यावर फिरत आहेत. ही कुत्री बीड रोड, नगर रोड, तपनेश्वर, सदाफुले वस्ती, पेठ, पोलीस स्टेशन तसेच बाजारपेठ, बसस्थानक परिसरात वावरत असून, यामुळे नागरिकांना व ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
कुत्र्यांना हाकलायचा प्रयत्न केल्यास ती अंगावर येत आहेत. या कुत्र्यांमुळे वयोवृद्ध व लहान बालके यांना रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे बनले आहे. कधीही कुत्री अंगावर येण्याची शक्यता नाकरता येत नाही. शहरातील काही शेतकऱ्यांच्या शेळ्यांचा चावाही या कुत्र्यांनी घेतल्याचे नागरिक सांगतात. अनेक वेळा मोटारसायकलला कुत्री आडवे आल्याने अनेक जण पडून जखमी झाले आहेत. अनेकांच्या पायाला व हाताला दुखापत झाली. त्यामुळे या कुत्र्यांचा नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.