सरकारला चांगले काम करणारे अधिकारी नकोत, रमी खेळणारा कृषीमंत्री हवा – आमदार रोहित पवार

0
525

जामखेड न्युज—–

सरकारला चांगले काम करणारे अधिकारी नकोत, रमी खेळणारा कृषीमंत्री हवा – आमदार रोहित पवार

जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून या बदलीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना विशिष्ट गटात सोयीच्या विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आदेश न जुमानल्याने तहसीलदारांची गडचिरोलीला बदली करण्यात आल्याचा घणाघाती आरोप आमदार रोहित यांनी केला आहे. मात्र राज्यातील शेतकरी अडचणीत असताना सभागृहात रमी खेळणारा कृषी मंत्र्यावर सरकार काहीही कारवाई करताना दिसत नाही.

जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्या बदलीचा मंगळवारी आदेश निघाला असून त्यांची धानोरा (जि. गडचिरोली) येथे बदली करण्यात आली आहे. अवघ्या एका वर्षात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने जामखेडच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हा परिषदेच्या गटरचनेचे काम सुरु आहे. जामखेड तालुक्यात साकत, खर्डा आणि जवळा असे तीन गट असून यातील काही गटातील गावे ही दुसऱ्या गटात समाविष्ट करण्याचा आदेश ‘वरून’ देण्यात आला होता. परंतु सत्ताधारी असो की विरोधक त्यांच्या राजकीय आदेशापेक्षा नियमाला महत्त्व देणारे तहसीलदार गणेश माळी यांनी या आदेशाचे पालन केले नाही. यावरून वजनदार सत्ताधारी नेत्याने संबंधित अधिकाऱ्याच्या अंगावर फाईलच भिरकावल्याची जोरदार चर्चा आहे. वॉर्ड रचना असो, गट रचना असो किंवा गण रचना ही सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच आपल्या सोयीची केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे आणि संबंधित तहसीलदारांची बदली थेट गडचिरोलीला करण्यात आल्याचे दिसत आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात समागृहात “18 ते 22 मिनिटं कृषी मंत्री सभागृहात रमी खेळत होते, असा स्पष्ट व्हिडिओ पुरावा आहे. इतक्या मोठ्या पदावर असलेल्या मंत्र्याकडून हे वर्तन अयोग्य आणि शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित करणारे आहे,” “अहवाल सरकारकडे आला आहे, मात्र तो जनतेसमोर आणणे आवश्यक आहे,” अशी मागणी आ. रोहीत पवार यांनी करून सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह करत मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांना उद्देशून म्हटलं, की “अटल बिहारी वाजपेयी किंवा यशवंतराव चव्हाण यांचे विचार आपण मानत असाल, तर आता हा अहवाल आल्यानंतर त्या मंत्र्यांवर तुम्ही काय कारवाई करता, हेच महाराष्ट्र पाहणार आहे.” अशी प्रतिक्रिया आ. रोहीत पवार यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

आ. रोहीत पवार बुधवारी जामखेड येथील श्री नागेश्वर मंदीरात दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्रीनागेश्वर सेवा मंडळ, संत शिरोमणी श्री सावता महाराज मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांची तडकाफडकी गडचिरोली येथे बदली झाली याबाबत आ. रोहीत पवार म्हणाले, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाली हे दुर्दैव आहे.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा त्यांनी थेट नामोल्लेख टाळून केला सत्तेचा कसा गैरवापर केला जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जामखेडच्या तहसीलदारांची झालेली बदली आहे. अगामी ‘‘जिल्हा परिषद निवडणुकीची गटरचना करताना ती राजकीयदृष्ट्या आपल्या सोयीची व्हावी यासाठी काही गावांचा विशिष्ट गटात समावेश करण्याचा हट्ट तहसीलदारांनी मान्य केला नाही. त्यामुळं अहंकाराला धक्का लागलेल्या नेत्याने पदाचा गैरवापर करत राजकीय दबावाला बळी न पडता नियमाप्रमाणे काम करणाऱ्या तहसीलदारांना थेट गडचिरोलीचा रस्ता दाखवला. तहसीलदारांच्या बदलीमुळं काहींना क्षणिक असा विकृत आनंद मिळेल पण त्याचा प्रशासनावर विपरित परिणाम होतो त्याचं काय? अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाचं असं बक्षीस मिळत असेल तर त्यांनी केवळ सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं म्हणून काम करायचं का? आता नवीन तहसीलदारांकडून जिल्हा परिषदेच्या गटरचनेत अहंकारी नेत्याला अपेक्षित बदल होतात की नाही, याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.’’ सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावं अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांची धुंदी उतरवल्याशिवाय राहणार नाही.’’

चौकट

जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री नागेश्वर सेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ते म्हणाले, श्री नागेश्वर सेवा मंडळाने यापूर्वी जे मागीतले ते दिले आहे. आता ह्या मंदीर नवीन बांधायचे असेल तर सेवा मंडळाने सांगावे तुमच्या काय कल्पना आहे ते सांगा आपण त्याप्रमाणे बांधून देऊ तसेच याबाबत आणखी काही सेवा करण्याची संधी द्या ती पूर्ण करेल असे आश्वासीत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here